पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

T20 World Cup 2021: आयसीसी वर्ल्ड टी-20 च्या आगामी आवृत्तीसाठी ग्रीन आर्मीत पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार सरफराज अहमदच्या (Sarfaraz Ahmed) पुनरागमनबाबत पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज इंझमाम-उल हक (Inzaman-ul-Haq) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सोहेब मकसूदला कन्क्शनमुळे आयसीसी स्पर्धेतून वगळण्यात आल्यानंतर बाबर आजमच्या पाकिस्तानी संघाला मध्यंतरी अंतिम मुदतीपूर्वी विश्वचषक संघात बदल करावा लागला. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (Pakistan Cricket Board) टी-20 विश्वचषकसाठी मकसूदच्या जागी शोएब मलिकची पुनरागमन करण्याची घोषणेसह सरफराज अहमद, हैदर अली आणि फखर जमान यांना संघात स्थान दिले होते. पीसीबीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी केलेल्या अलीकडील बदलांची दखल घेत, माजी दिग्गज फलंदाज इंजमामने सरफराजच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे शोएब मकसूद संघाबाहेर; 'या' खेळाडूला मिळाली संधी)

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना इंजमाम आपले मत करत म्हणाले की, “सरफराजसारख्या 'प्रतिष्ठित' माजी कर्णधाराला न खेळण्यात काही अर्थ नाही. जर निवड समितीला कामगिरीच्या आधारावर निवड करायची असेल तर त्यांना वय आणि इतर घटक विसरण्याची गरज आहे. जर तुम्ही सरफराजला खेळणार नाही तर त्याला का घेऊन जात आहात? गेल्या दोन वर्षांत त्याने किती टी-20 खेळले आहेत? तो एक प्रतिष्ठित माजी कर्णधार आहे - त्याच्यासह, आणि त्याला न खेळल्याने काही अर्थ नाही,” इंजमाम म्हणाला. पाकिस्तानने शनिवारी जखमी मकसूदच्या जागी माजी कर्णधार मलिकचा समावेश करण्यापूर्वी इंजमामने वक्तव्य केले. सरफराज, हैदर आणि जमानच्या समावेशासह पाकिस्तानने विश्वचषक संघात चौथा बदल केला आहे.

आझमचा पाकिस्तान संघ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेचा सराव सामना खेळले आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी विराट कोहलीच्या टीम इंडियाविरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुकाबल्यासह मोहिमेची सुरुवात करेल. पाकिस्तान संघ 15 ऑक्टोबर रोजी यूएईला रवाना होईल असे समजले आहे. त्यापूर्वी खेळाडू लाहोरमध्ये प्रशिक्षण घेतील. स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध होईल. 2019 वनडे विश्वचषकनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.