Team India (Photo Credit - X)

नागपूर: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium, Nagpur) खेळला जात आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला बळकटी देण्यासाठी भारतीय संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. यापूर्वी, टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला होता. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

बटलर आणि बेथेलचे अर्धशतक

इंग्लंडने 47.4 षटकांत सर्वबाद 248 धावा केल्या. सुरुवातीला कर्णधाराचा निर्णय बरोबर ठरला कारण 70+ पर्यंत एकही विकेट पडली नाही. त्यानंतर, एकामागून एक विकेट पडल्या आणि इंग्लंडला सावरता आले नाही. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली. फिलिप सॉल्टने 43 धावांची खेळी खेळली. शेवटी, जोफ्रा आर्चर २१ धावा करून नाबाद राहिला. (हे देखील वाचा: Harshit Rana: हर्षित राणाच्या नावे पदार्पणाच्या सामन्यात लाजिरवाणा रेकॉर्ड; एका षटकात सर्वाधिक धावा देणारा बनला भारतीय गोलंदाज)

 हर्षित-जडेजा चमकले

भारताकडून हर्षित राणाने 7 षटके टाकली. यादरम्यान त्याने 53 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने 9 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 249 धावा करायच्या आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घ्यायची आहे.