
IND vs ENG Series 2021: इंग्लंडचा (England) आघाडीचा वेगवान कसोटी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मंगळवारी इन्स्टाग्रामवर चेन्नईत त्याच्या डेथट्रॅप बाल्कनीची क्लिप शेअर केली. भारत दौऱ्यावर इंग्लंड (England Tour of India) संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेन्नई येथे आहे. इंग्लंड संघ चेन्नई येथील हॉटेल लीला पॅलेसमध्ये (Hotel Leela Palace) थांबले आहे, आणि त्याच्या खोलीच्या बाल्कनीतून दृश्याचा आनंद घेत असताना ब्रॉडने आपल्या खोलीतील बाल्कनीतून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्याच्या बाल्कनीतली रेलिंग तुटली असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे पंचतारांकित हॉटेलमधून बंगालच्या (Bay of Bengal) उपसागरातील उद्भूत दृश्य पाहायला मिळते पण ब्रॉडला हे दृश्य अनुभवण्यापूर्वी काळजी घ्यावी लागेल किंवा आपली बाल्कनी रेलिंग सावधान राहणे निश्चित करावे लागेल. उल्लेखनीय म्हणजे, श्रीलंका दौऱ्यावरून भारतात आलेला इंग्लंड संघ हॉटेल लीला पॅलेसमध्ये सहा दिवस क्वारंटाइन होता. (Joe Root 100th Test vs India: भारताविरुद्ध शंभरावी टेस्ट खेळत ‘या’ 5 दिग्गजांनी गाजवले मैदान, आता इंग्लंड कर्णधार जो रूट कडूनही कमाल खेळीची अपेक्षा)
दरम्यान, ब्रॉडने आपल्या पहिल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या बाल्कनीतून सुंदर देखाव्याचा फोटो पोस्ट केला आणि त्यास 'इन्स्टाग्राम' असे कॅप्शन दिले. त्यानंतर, त्याने दुसऱ्या स्टोरीमध्ये त्याच्या त्याच्या खोलीची सैल बाल्कनी रेलिंगचा व्हिडिओ पोस्ट केला. प्रत्यक्षात चित्र कसे असते याचा संदर्भ देत त्याने 'वास्तविकता' असे व्हिडिओला कॅप्शन दिले.


भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघातील अनुभवी खेळाडूंपैकी ब्रॉड एक आहे. इंग्लिश संघासाठी आणि मालिकेचा निकाल निश्चित करण्यात त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल.भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका शुक्रवार, 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे सुरू होणार आहे. दुसरा सामना त्याच ठिकाणी 13-17 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. त्यानंतर, अंतिम दोन कसोटी सामने 24 ते 28 फेब्रुवारी आणि 4 ते 8 मार्च दरम्यान नवनिर्मित सरदार पटेल स्टेडियम (जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम) येथे खेळले जातील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पात्रतेची दोन्ही संघांसाठी कसोटी मालिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कसोटी मालिकेनंतर अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. दुसरीकडे, तीन वनडे सामने पुण्यात 23, 26 आणि 28 मार्च रोजी खेळले जातील.