Joe Root 100th Test vs India: भारताविरुद्ध शंभरावी टेस्ट खेळत ‘या’ 5 दिग्गजांनी गाजवले मैदान, आता इंग्लंड कर्णधार जो रूट कडूनही कमाल खेळीची अपेक्षा
जो रूट (Photo Credit: PTI)

Joe Root 100th Test vs India: भारताविरुद्ध (India) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) 5 फेब्रुवारीपासून खेळला जाणारा पहिला टेस्ट सामना इंग्लंड कर्णधार जो रूटसाठी (Joe Root) अत्यंत खास सिद्द होणार आहे. पहिल्या चेन्नई टेस्टसाठी (Chennai Test) मैदानावर उतरताच रूट 100 किंवा अधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लंडचा 15वा खेळाडू ठरेल. इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकने (Alastair Cook) सर्वाधिक 161 सामने खेळले आहे. श्रीलंकाविरुद्ध 400हुन अधिक धावा करणाऱ्या इंग्लंड टेस्ट कर्णधार रूटकडून संघाला भारताविरुद्ध मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे इंग्लिश कर्णधार रूट भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात शंभरी गाठणारा खेळाडू असेल. यापूर्वी, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांसारख्या देशातील खेळाडूंनी भारताविरुद्ध खेळत टेस्ट क्रिकेट सामन्यात शंभरी गाठली आणि मैदान मारलं. या लिस्टमध्ये आता रूट देखील सामील होणार असल्याने इंग्लंड कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. (England Likely Playing XI for 1st Test vs India: चेन्नई टेस्ट सामन्यात अशी असू शकते इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन, टीम इंडियाविरुद्ध ‘हे’ 2 ठरू शकतात ‘ट्रम्प कार्ड’)

दरम्यान, आज आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी भारताविरुद्ध आपल्या टेस्ट करिअरमधील 100वा सामना खेळला आणि मैदान गाजवलं.

1. जावेद मियांदाद (1989)

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि फलंदाज जावेद मियांदाद यांनी 1989 मध्ये भारताविरुद्ध 100वा कसोटी सामना खेळला. भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यावरील लाहोर टेस्ट सामन्यात मियांदाद यांनी हा विक्रमी टप्पा गाठला. दोन्ही संघातील सामना अनिर्णीत राहिला असला तरी मियांदाद यांनी सामना संस्मरणीय बनावट 145 धावांचा तुफानी डाव खेळला होता.

2. इंझमाम-उल-हक (2004)

पाकिस्तानसाठी 100व्या टेस्ट सामन्यात शतकी खेळी करणारे इंझमाम-उल हक दुसरे फलंदाज होते. 2004 भारत दौऱ्यावर पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी असताना इंझमाम यांनी बेंगलोर टेस्ट सामन्यात ही कमाल केली होती. इंझमाम यांनी 184 धावांच्या जोरावर पाकिस्तानने सामना 168 धावांनी विजय मिळवला.

3. कार्ल हूपर (2002)

2002 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार असलेल्या कार्ल हूपर यांनी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत सहभागी होत, 100वा आंतरराष्ट्रीय टेस्ट खेळण्याचा मान मिळवला होता. या सामन्यात विंडीज संघाला डाव आणि 112 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता, शिवाय हूपर यांनी दोन डावात फक्त 24 धावा केल्या. इतकंच नाही तर याच मालिकेतील अखेरच्या कोलकता टेस्ट सामन्यात खेळत हूपर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.

4. रॉस टेलर (2020)

मागील वर्षी भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान अनुभवी किवी फलंदाज टेलरने कसोटी क्रिकेटमध्ये महत्वाचा टप्पा गाठला होता. टेलरने सामन्यात फक्त 44 धावा केल्या पण यजमान संघाने 10 विकेटने सामना जिंकत टेलरचा शंभरावा टेस्ट सामना अधिक संस्मरणीय बनवला.

5. ग्लेन मॅकग्रा (2004)

ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज मॅकग्राने भारत दौऱ्यावर नागपूर सामन्यात टेस्ट सामन्यात शंभरी गाठली. मॅक्ग्राने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 विकेट घेत समाधानकारक कामगिरी केली त्यानंतर संघाने सांघिक कामगिरी करत 342 धावांनी मोठा विजय नोंदवला.