England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या अमिराती ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लडंने श्रीलंकेचा पाच विकेट राखुन पराभव केला आहे. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा पहिला डाव 236 धावांत आटोपला. लंकेकडून कर्णधार धनंजया डी सिल्वाने 74 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर इंग्लंडकडून पहिल्या डावात ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
Sri Lanka made it a hard-fought contest, but England get over the line to go 1-0 up at Old Trafford!#ENGvSL scorecard: https://t.co/1E7nBMfnMe pic.twitter.com/LjWBzXGmCB
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 24, 2024
त्यानंतर इंग्लंडचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 85.3 षटकात 358 धावा करत ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने 111 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. असिथा फर्नांडोशिवाय प्रभात जयसूर्याने तीन विकेट्स घेतल्या.
चौथ्या दिवसाचा खेळ असताना दुसऱ्या डावात 89.3 षटकात 326 धावा करून श्रीलंकेचा संपूर्ण संघ बाद झाला. श्रीलंकेने 204 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेसाठी कमिंडू मेंडिसने 113 धावांची सर्वोत्तम खेळी केली. कामिंदू मेंडिसशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश चंडिमलने 79 आणि अँजेलो मॅथ्यूजने 65 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि मॅथ्यू पॉट्स यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. या दोघांशिवाय गस ऍटकिन्सनने दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने अवघ्या 57.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक नाबाद 62 धावांची खेळी खेळली. जो रूटशिवाय डॅनियल लॉरेन्सने 34 आणि जेमी स्मिथने 39 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या आणि असिथा फर्नांडो यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल.