विश्वचषकमध्ये जेतेपद मिळवल्यानंतर इंग्लंड (England) संघ आणि सर्व चाहत्यांचे लक्ष असेल ते पारंपरिक अॅशेस मालिकेकडे. 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध टेस्ट मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम 11 सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात विश्वचषकमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) ला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम करन (Sam Curran) आणि ऑली स्टोन (Olly stone) यांना देखील अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. दुसरीकडे, विश्वचषकमध्ये इंग्लंडची दमदार फलंदाजी करणारा यजमानांचा सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) याला संधी देण्यात अली आहे. रॉयने विश्वचषकमध्ये जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या साथीने उत्कृष्ट खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. शिवाय त्याने इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. (Ashes 2019: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिका दरम्यान हे 5 खेळाडू असतील मुख्य आकर्षण)
दरम्यान, अॅशेस मालिकेचे जेतेपद सध्या ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी 2017-18 ची मालिका 4-0 अशी जिंकली होती. त्यामुळे आता घरच्या मैदानावर पुन्हा अॅशेस जिंकण्याचा इंग्लंडचा निर्धार असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसंघातील अॅशेस मालिका अतिशय मोलाची मानली जाते. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियासाठी देखील गोड बातमी समोर आली. त्यांचा सलामीवीर उस्मान ख्वाजा फिट झाला आहे. ख्वाजा आणि जेम्स पॅटिन्सन हे अॅशेसची पहिली टेस्ट खेळतील, अशी माहिती प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली.
🚨 BREAKING NEWS 🚨
We have named our team for the first #Ashes Test!
— England Cricket (@englandcricket) July 31, 2019
यंदाच्या अॅशेस मालिकेपासून टेस्ट क्रिकेटमध्ये मोलाचे बदल करण्यात आले आहे. या अॅशेसपासून खेळाडूंच्या सफेद जर्सीवर नाव आणि नंबर पाहायला मिळणार आहे. याआधी वनडे आणि टी-२०मध्ये खेळाडूंच्या जर्सीवर त्यांची नावे आणि त्यांचा नंबर असायचा. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन जो रुटचा एक फोटो शेअर केला आहे. जो रुटच्या जर्सीवर ६६ नंबर दिसत आहे.
असे आहे इंग्लंडचे प्लेयिंग इलेव्हन: रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो रूट (कॅप्टन), जोए डेन्ली, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन