
भारत आणि पाकिस्तान मधील क्रिकेट प्रतिद्वंदीत जितकी चर्चेत राहते, तितकीच ऑस्ट्रेलिया (Australia)-इंग्लंड (England) मधील अॅशेस (Ashes) मालिका पण देखील असते. या दोन देशांमधील क्रिकेटची स्पर्धा मनोरंजक आणि आणि सर्वोत्कृष्ट असते. 1 ऑगस्टपासून हे दाेन्ही संघ इंग्लंडच्या मैदानावर आमने-सामने असतील. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील अॅशेस मालिका प्रतिष्ठेची मानली जाते. मैदानावर स्लेजिंग देखील भरपूर केली जाते. क्रिकेटमधील या ऐतिहासिक मालिकेत दोन्ही संघ आपली सर्व ताकद झोकून मैदानात खेळ करतात आणि त्यामुळे ही मालिका पाहणे या दोन देशांच्या क्रिकेटप्रेमीसांठी मोठी पर्वणीच असते. ऑस्ट्रेलियाचा संघ 2001 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील. गुरुवारी एजबॅस्टन (Edgbaston), बर्मिंगहॅम (Birmingham) येथे 5 टेस्ट सामन्याची सुरुवात होईल. (Ashes 2019: 1st अॅशेस टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला Sledge करण्यासाठी इंग्लंडने घेतला विश्वचषक सेमीफायनलच्या अंतिम स्कोअरबोर्डचा आधार)
या विलक्षण टेस्ट मालिकेत हे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचे हे 5 खेळाडू मुख्य आकर्षण असतील.
जो रूट (Joe Root)

इंग्लंडचा कर्णधार जो रूट पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी महत्वाचा असेल यात शंका नाही. नुकतेच इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर आयर्लंड विरुद्ध टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात 85 धावांवर माघारी परतल्यानंतर देखील त्यांनी सामना जिंकला. यामुळे त्यांचे मनोबल उंचावले असतील हे निश्चित. रूट सध्या टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 टेस्ट सामन्यांमध्ये त्याने 1369 धावा केल्या आहेत, हे कोणत्याही संघाविरूद्ध त्याची दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या नावावर 3 शतक आणि 9 अर्धशतकं आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 6718 धावा करणारा इंग्लंडचा हा कर्णधार यंदादेखील चर्चेत राहील.
डेविड वॉर्नर (David Warner)

चेंडू कुरतडल्याची शिक्षा भोगलेल्या त्रिकुटांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरने आयपीएल आणि विश्वचषकमध्ये दमदार प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. वॉर्नरचा सध्याचा फॉर्म पाहता यंदाच्या मालिकेत त्याला खेळताना पाहणे हे त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी असेल. पण सध्या त्याचे पहिल्या टेस्टमध्ये खेळण्यावर अजून निश्चितता नाही आहे. आजवर 74 टेस्ट सामन्यात 9634 धावा करणाऱ्या वॉर्नरने इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये सर्वाधिक 1520 धावा केल्या आहेत.
जेम्स अँडरसन (James Anderson)

इंग्लंड टेस्ट क्रिकेट खेळात आहे आणि यात जेम्स अँडरसन बद्दल बोलणं नाही असे होऊच शकत नाही. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या इंग्लंडच्या या दिग्गज वेगवान गोलंदाजापासून ऑस्ट्रेलियाला सावध राहावे लागणार आहे. अॅशेस मालिकेत त्याने अनेकदा नायकाची भूमिका साकारली आहे आणि यावेळी तर तो आपल्याच मैदानावर खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक 575 विकेट्स घेणाऱ्या या गोलंदाजांचे पुढील लक्ष 600 विकेट्स घेण्याचे असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 104 विकेट्स घेतल्या आहेत.
मिशेल स्टार्क (Mitchell Starc)

इंग्लंडकडे जर जेम्स अँडरसन आहे तर ऑस्ट्रेलियाकडे त्यांचे उत्तरः आहे, नाव आहे-मिशेल स्टार्क. ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने यंदाच्या विश्वचषकमध्ये 27 गडी बाद करत दोन सलग दोन विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम देखील केला. शिवाय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही त्याने मोडला. स्टार्क सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि इंग्लंडचे फलंदाज घाबरण्याचे कारणदेखील आहे कारण काही दिवसांपूर्वी स्टार्कने याच खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. आजवर 51 टेस्ट सामन्यांमध्ये 211 विकेट्स घेणाऱ्या या गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 51 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत.
बेन स्टोक्स (Ben Stokes)

यंदा यजमान देशाचा खास आणि महत्वपूर्ण चेहरा म्हणजे त्यांचा उपकर्णधार- बेन स्टोक्स. क्रिकेट विश्वचषकच्या फायनलमध्ये उत्कृष्ट खेळी करत या अष्टपैलू खेळाडूने सर्वांचे मन जिंकले. आता स्टोक्स टेस्ट क्रिकेटसाठी सज्ज आहे आणि अॅशेस मालिकेमध्ये अष्टपैलू खेळाडूचा दबदबा पाहायला मिळाल्याचा इतिहास साक्षीदार आहे. एकेकाळी अँड्र्यू फ्लिंटॉफ इंग्लंड संघासाठी जशी भूमिका बजावली होती तशी भूमिका एन्ड स्टोक्स याला करून दाखवायची असेल.