इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनवर (James Anderson) इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडीजमधील (West Indies) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी चेंडू चमकवण्यासाठी लाळ (Saliva) वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसीसीने (ICC) कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरण्यास बंदी घातली आहे. लाळ बंदीसह (Saliva Ban)इंग्लंड-वेस्ट इंडीज कसोटी मालिका सुरू झाल्यापासून सुरक्षाविषयक अनेक नवीन नियम अंमलात आणले गेले आहेत. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजसमोर पाचव्या दिवशी चौथ्या डावात जिंकण्यासाठी केवळ 200 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर इंग्लंडचा हा गोलंदाज नियमांचे उल्लंघन करताना पकडला गेला. अँडरसनने चेंडूवर लाळ लावला हा पुरावा म्हणून सोशल मीडियावर यूजर्सने एका व्हिडिओकडे लक्ष वेधले आहे. मात्र, पुरावा कॅमेरा अँगलमुळे अनिश्चित नाही आहे कारण त्याचे तोंड त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाही. (England Vs West Indies 1st Test 2020 Match Result: पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय; मालिकेत आघाडी)
जेव्हा अँगल स्पष्ट झाला तेव्हा त्याने घामासाठी आपले बोट कपाळाला पुसले. आयसीसीने खेळाडूंना घाम वापरण्यास बंदी घातली नाही. दुसर्या प्रसंगी, कॅमेराने आपली दिशा बदलली आणि अँडरसनचे उल्लंघन लपविण्यासाठी मुद्दाम केले गेले असाचाहत्यांचा विश्वास आहे. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. एका चाहत्याने तर असेही म्हटले की, 'स्काय स्पोर्ट्स काय विनोद करताहेत? जेव्हा जेव्हा अँडरसन बॉल चमकावण्यास सुरु करतो तेव्हा तो त्याला कॅमेर्याची दिशा बदलतात. तो चेंडूवरुन लाळ घासत असल्याचे स्पष्ट दिसत आहे."
पाहा हा व्हिडिओ:
Jimmy Anderson blatantly putting saliva on the ball, pretty sure that's outlawed #bbccricket pic.twitter.com/MKDlM62ht6
— Si Lomas (@SLomasSCFC1883) July 12, 2020
आयसीसीच्या नियमानुसार डावा दरम्यान गोलंदाजी संघातील खेळाडूंना दोनदा इशारा देण्याची तरतूद आहे, मात्र त्यानंतरही जर खेळाडू पकडले गेले तर संघावर पाच धावांचा दंड लावण्याची तरतूद आहे. परंतु अंपायरांकडून आतापर्यंत इंग्लंडला एकदादेखील इशारा देण्यात आलेला नाही. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. चौथ्या डावात विंडीजकडून जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार 95 धावांची खेळी केली आणि संघाला 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. शिवाय, पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएलने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 असे 9 गडी बाद केले.