Dwayne Bravo (Photo Credit - Twitter)

वेस्ट इंडिज आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा (600 wickets in T20s) ब्राव्हो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. 38 वर्षीय या खेळाडूने ब्राव्होने द हंड्रेडमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सचे प्रतिनिधित्व केले, जिथे त्याने द ओव्हल इनव्हिन्सिबल्सच्या रिले रुसोला एलबीडब्ल्यू करून पराक्रम गाजवला. ब्राव्होला टी-20 क्रिकेटमध्‍ये एक दिग्गज मानले जाते आणि आता तो झटपट फॉर्मेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांचा शिकार करणारा गोलंदाज बनला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आहे, ज्याने 339 सामन्यांत 466 विकेट घेतल्या आहेत. ब्राव्होने 16 फेब्रुवारी 2006 रोजी ऑकलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी-20 पदार्पण केले, त्यानंतर त्याने 25 पेक्षा जास्त संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने वेस्ट इंडिजसाठी 91 सामन्यांत 78 बळी घेतले आणि उर्वरित 522 विकेट जगभरातील विविध लीगमध्ये घेतल्या आहे. दोन वेळा T20 विश्वचषक विजेत्या कॅरेबियन संघाचा सदस्य असलेल्या ड्वेन ब्राव्होने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (हे देखील वाचा: Legends League Cricket: लेजेंड्स लीग क्रिकेटला सप्टेंबरमध्ये होणार सुरूवात, सौरव गांगुली पुन्हा करणार भारतीय संघाचे नेतृत्व)

Tweet

ब्राव्होचे भारतात खूप चाहते आहेत आणि तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करतो. ब्राव्हो हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही आहे. ब्राव्होने आयपीएलमधील 161 सामन्यांमध्ये 183 विकेट घेतल्या आणि दोन वेळा पर्पल कॅप जिंकला. लसिथ मलिंगाला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ब्रोवाच्या नावावर आहे.