अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) सकारात्मक लागण झाल्याचे समोर आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. ट्रम्प यांना कोविदा-19 ची लागण झाल्याची माहिती कळताच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त केली. अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटले की त्यांना आणि प्रथम महिला मेलानिया कोरोना पॉसिटीव्ह झाल्याचे आढळले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दरम्यान जगभरातील नेते आणि अमेरिकन नागरिक ट्रम्प दाम्पत्याची तब्येत लवकरात लवकर बारी व्हावी यासाठी संदेश देत असताना भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानेही आपल्या खास शैलीत ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती ट्रम्प यांना शुभेच्छा देताना सेहवागने 'बाबा' अवतार घेतला आणि ट्रम्प दाम्पत्याला आशिर्वाद दिला. (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump आणि त्यांची पत्नी Melania Trump यांना COVID 19 ची लागण)
"ट्रम्प यांना कोविड-19 चा सामना करण्यासाठी बाबा सेहवागचा आशिर्वाद...गो कोरोना गो कोरोना गो," म्हणत सेहवागने 'बाबा' वेशातील एक मजेदार फोटो ट्विटरवर पोस्ट केला. ट्विटरवर सेहवागचा हा नवीन अवतार चांगला व्हायरल होत आहे. सेहवागने असे ट्वीट करण्याची ही पहिली वेळ नाही. सेहवाग सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो आणि आपल्या स्टाईलमध्ये ट्वीट करत राहतो. काही मिनिटांतच, सेहवागच्या संतांसारख्या पिवळ्या रंगाचा पोशाखातील फोटो ज्यामध्ये त्याने गळ्यामध्ये रुद्राक्षची माला घातली आहे, तो इंटरनेटवर काही मिनिटांचं व्हायरल झाला. तुम्हीही पाहा...
Trump ko Covid se nipatne ke liye Baba Sehwag ka aashirwad.
Go Corona Go Corona Go pic.twitter.com/6hVivMU9kY
— Virender Sehwag (@virendersehwag) October 2, 2020
पाहा ट्रम्प यांची पोस्ट:
Tonight, @FLOTUS and I tested positive for COVID-19. We will begin our quarantine and recovery process immediately. We will get through this TOGETHER!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटमध्ये म्हटले की त्यांनी आणि पत्नी मेलानिया यांनी अनिवार्य असलेली क्वारंटाइन प्रक्रिया सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉसिटीव्ह असल्याची बातमी आगामी निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान समोर आली आहे, ज्याला आता फटका बसण्याची शक्यता आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान ट्रम्प संपूर्ण अमेरिकेत बराच प्रवास करत होते. अमेरिकेला कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे. देशात आजवर 7,277,352 जण या घातक व्हायरसने संक्रमित झाले आहे तर मुरतंच आकडा 2,07,791 वर पोहचला आहे.