IPL मध्ये ‘हे’ 3 युवा भारतीय धुरंधर Virat Kohli याच्या एका मोसमात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड मोडण्याचे बनू शकतात प्रबळ दावेदार
विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर एका इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद आहे. 2016 मध्ये आरसीबी (RCB) कर्णधार आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता आणि तो हंगाम त्याच्यासाठी खूपच अनोखा ठरला. या मोसमात आरसीबीने फक्त आयपीएल फायनलमधेच प्रवेश केला नाही तर कर्णधार विराटने संपूर्ण हंगामात धावांचा जोरदार पाऊस पाडला. या दरन त्याने सर्वाधिक 973 धावांचा डोंगर गाठला. यादरम्यान त्याने 4 वेळा शंभरी देखील पार केली. सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन कर्णधार डेविड वॉर्नरला त्या मोसमात 848 धावांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आयपीएल 2021 मध्ये यंदाही अनेक रेकॉर्ड मोडले किंवा निर्माण केले जातील पण असे फलंदाज जे आगामी काळात विराटच्या या अबाधित विक्रमला मोडू शकतात अशांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय)

1. देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)

मागील वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या पडिक्क्लने आपल्या बॅटिंगने सर्वांनाच प्रभावित केले. विजय हजारे तोफय 2019-20 मध्ये घरगुती क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या पडिक्क्लने त्या मोसमात 609 धावा केल्या ज्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर आयपीएलमध्ये खेळत त्याने पहिल्याच मोसमात 15 सामन्यात 473 धावा चोपल्या व ऑरेंज कॅपच्या शर्यतीत स्थान निर्माण केले. युवा पडिक्क्लचे आयपीएल करिअर आत्ताच सुरु झालेले असताना आगामी काळात त्याने आपल्या खेळीत सातत्य कायम ठेवले तर तो नक्कीच आपल्या आरसीबी कर्णधाराचा रेकॉर्ड मोडण्याच्या दावेदारांपैकी एक बनू शकतो.

2. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)

मुमबीकर फलंदाज पृथ्वीला आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करावे लागत असताना घरगुती क्रिकेटमध्ये तो एकामागोमाग एक विक्रम गाठत आहे. भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता कर्णधार पृथ्वीने मागील आयपीएलच्या 13 सामन्यात 228 धावा केल्या होत्या. त्याला धावांमध्ये सातत्य राखता आले नाही, मात्र आपल्या खेळात यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 800 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या जे सिद्ध करते की त्याचा फॉर्म स्थिर राहिल्यास तो विराटच्या विक्रमी आयपीएल धावांच्या पार जाऊ शकतो.

3. केएल राहुल (KL Rahul)

आयपीएल 2020 मध्ये राहुल आपल्या उत्कृष्ट बॅटिंगच्या जोरावर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. त्याने संघाला अनेक वेळा एकहाती सामना जिंकून दिला असला तरी अखेरीस संघाला अपेक्षित परिणाम मिळवता आले नाही. मागील वर्षी त्याने 14 सामन्यांत 670 धावा केल्या. फलंदाजीमध्ये त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि तो कोहलीचा विक्रम प्रबळ दावेदारांपैकी एक असू शकतो.