Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय
मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2021: मुंबईकर टीम इंडिया फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) असा एक खेळाडू ज्याने अशक्य देखील शक्य करून दाखवले आहे. 2008 पासून पहिले डेक्कन चार्जर्स आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL) कमाल कामगिरी करणाऱ्या रोहितने लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. रोहित 2011 मध्ये मुंबई संघात सामील झाला आणि त्यांनतर 2013 मध्ये स्पर्धेच्या मध्यभागात त्याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण तो यामुळे खचून गेला नाही आणि स्वतःवर दबाव येऊ दिला नाही. याचेच उदाहरण म्हणजे रोहितने मुंबईला विक्रमी पाच विजेतेपद जिंकून दिले आहेत. अशास्थितीत जेव्हा रोहित निवृत्त होईल तेव्हा मुंबईपुढे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची योग्य खेळाडूची निवड करण्याचा पेच आहे. आज आपण अशाच 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे रोहितनंतर मुंबईचे कर्णधार बनू शकतात. (MI vs SRH IPL 2021: Rohit Sharma बनला सिक्सर किंग्स, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा ‘हिटमॅन’ बनला नंबर-1 भारतीय फलंदाज)

1. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलची सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमारने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 2015 मध्ये आपल्या मॅच-विनिंग खेळीने ओळख निर्माण केली. त्यानंतर तो 2018 मध्ये पुन्हा मुंबईत सामील झाला आणि संघाचा नियमित सदस्य बनला. सूर्यकुमारने यापूर्वी मुंबई संघाचे 2019 रणजी ट्रॉफी स्पर्धेत नेतृत्व केले होते. अशास्थतीत त्याच्याकडे फलंदाजीसह नेतृत्वाचा देखील अनुभव आला आहे. शिवाय, मुंबईसह अनेक वर्ष खेळत असल्याने संघाची मानसिक स्थती जाणून आहे त्यामुळे रोहितच्या जागी एक पर्याय सिद्ध होऊ शकतो.

2. ईशान किशन

2016 अंडर-19 वर्ल्ड कप संघाचा कर्णधार किशन रोहितनंतर मुंबईच्या  मजबूत दावेदार आहे. आपल्या कुशल कर्णधारपदाच्या कौशल्यासाठी किशनचे अनेकांनी कौतुक केले. किशन एक उत्कृष्ट फलंदाजच नाही तर आपल्या नेतृत्वाने सामन्याचा निर्णय बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. ईशान घरगुती क्रिकेटमध्ये झारखंड संघाचे देखील नेतृत्व करत आहे. त्यामुळे आगामी काळात तो आयपीएल संघाचे नेतृत्व करताना दिसला तर चकित होऊ नका.

3. हार्दिक पांड्या

भारतीय संघाचा एक नियमित सदस्य असलेल्या हार्दिककडे कोणत्याही संघाच्या नेतृत्वाचा अनुभव नसला तरी खेळाबद्दलची त्याची समज चांगली आहे आणि सामन्यात दबावाच्या स्थितीत कसे निर्णय घ्यावे हे त्याला माहित आहे. हार्दिकने आपल्या बॅट व बॉलच्या मिश्रणाने संघाला अनेकदा सामने जिंकून दिले आहेत. पांड्या सध्या 27 वर्षाचा आहे आणि संघातील महत्त्वाचे सदस्य आहेत. हार्दिकला अनेकदा मैदानात महत्त्वाच्या प्रसंगी खेळाडूंशी चर्चा करताना पहिले गेले आहे. अशा परिस्थितीत शर्मानंतर त्याला मुंबईचा कर्णधार बनल्यास आश्चर्य वाटण्यासारखे ठरणार नाही.