MI vs SRH IPL 2021: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) यांच्यात चेन्नई येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास रचला आहे. रोहित आता स्पर्धेचा खरा सिक्सर किंग्स ठरला आहे. रोहितने फलंदाजी करत आपल्या 32 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि तितकेच षटकार खेचले. यासह शर्मा आयपीएलमध्ये (IPL) आता सर्वाधिक षटकार मारणारा नंबर-1 भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने आजवर 217 सिक्स खेचले असून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी 216 षटकारांसह त्याच्या मागे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)