PC-X

WPL 2025 Final: महिला प्रीमियर लीग 2025च्या फायनलमध्ये आज चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. जिथे मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्सशी सामना करेल. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ 2023 नंतर पुन्हा एकदा जेतेपदावर कब्जा करू इच्छितो. दिल्ली संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नसले तरी, प्रत्येक वेळी अंतिम फेरीत पोहोचून त्यांनी इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे मेग लॅनिंग तिन्ही वेळा संघाची कर्णधार होती. Delhi Capitals vs Mumbai Indians, WPL 2025 Final Match Live Streaming: इतिहास रचण्याची संधी! दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स जेतेपदासाठी आमने-सामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

अंतिम सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल. दोन्ही संघांनी लीग टप्प्यात आक्रमक कामगिरी केली आहे. त्यामुळे चाहत्यांना अंतिम फेरीत एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दिल्लीने स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संघाने आठ पैकी पाच सामने जिंकले आणि 10 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. त्याचप्रमाणे, मुंबई इंडियन्सनेही 10 गुण मिळवत दिल्ली संघाला कडवी झुंज दिली. तथापि, नेट रन रेटच्या बाबतीत संघ दिल्लीपेक्षा मागे पडला.

सर्वोत्तम ड्रीम 11 संघ

यष्टिका भाटिया. तसेच सारा ब्राइस आहे. (तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यापैकी कोणत्याही एका खेळाडूसोबत जाऊ शकता)

फलंदाज: शेफाली वर्मा, मेग लॅनिंग, हरमनप्रीत कौर (अमनजोत कौरच्या जागी आणखी एका गोलंदाजाचा समावेश होऊ शकतो)

अष्टपैलू खेळाडू: हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, मॅरिझाने कॅप, अ‍ॅनाबेल सदरलँड (तुमच्या आवडीनुसार जाऊ शकता)

गोलंदाज: शिखा पांडे, शबनीम इस्माइल

कर्णधार आणि उपकर्णधार: हेली मॅथ्यूज (कर्णधार), अ‍ॅनाबेल सदरलँड (उपकर्णधार)

दोन्ही संघांच्या संभाव्य इलेव्हन

मुंबई इंडियन्स: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सईका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.