DC vs RCB, IPL 2020: देवदत्त पडिक्क्लचे झुंझार अर्धशतक; रॉयल चॅलेंजर्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर 153 धावांचे आव्हान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

DC vs RCB, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) आजच्या सामन्यात टॉस गमावून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 152 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली आणि बेंगलोर यांच्यातील आजच्या सामन्यातील विजेता संघ थेट प्ले ऑफसाठी क्वालिफाय करेल तर दुसऱ्या संघाची वाट बिकट होईल. दोन्ही संघातील आजच्या सामन्यात आरसीबीसाठी (RCB) सलामी फलंदाज देवदत्त पडिक्क्लने (Devdutt Padikkal) झुंझार अर्धशतक ठोकले. देवदत्त वगळता एबी डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) 35 आणि विराट कोहलीने 29 धावांचे योगदान दिले. जोश फिलिपला आजच्या सामन्यात 12 धावाच करता आल्या. दुसरीकडे, दिल्ली गोलंदाजांनी बेंगलोरच्या फलंदाजांवर दबाव आणला, पण डेथ ओव्हरमध्ये डिव्हिलिअर्स आणि शिवम दुबेच्या फटकेबाजीने रॉयल चॅलेंजर्सचा आव्हानात्मक धावसंख्येकडे नेले. दिल्लीसाठी एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) सर्वाधिक 3 तर कगिसो रबाडाला 2 आणि रविचंद्रन अश्विनला 1 विकेट मिळाली. (DC vs RCB, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस, 'करो या मरो'च्या सामन्यात घेतला पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय)

नाणेफेक गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला देवदत्त आणि जोश फिलिप्पच्या जोडीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, 12 च्या वैयक्तिक धावांवर फिलिप कागिसो रबाडाच्या चेंडूवर पृथ्वी शॉकडे झेलबाद झाला. यानंतर देवदत्त आणि कर्णधार कोहलीमध्ये 50 हुन धावांची भागीदारी झाली. मात्र, कर्णधार कोहलीने 29 धावा केल्या आणि आर अश्विनच्या चेंडूवर स्टॉइनिसकडे झेलबाद झाला. आरसीबीसाठी देवदत्त पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून उदयास आला आणि त्याने अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत आयपीएल 2020 मधील पाचवे अर्धशतक झळकावले. मात्र, पुढील चेंडूवर नॉर्टजेने त्याला बोल्ड करून माघारी धाडलं. त्यानंतर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात शिवम दुबे रबाडाच्या चेंडूवर 17 धावा करून झेलबाद झाला. डिव्हिलियर्स 35 धावा करुन चोरटी धाव घेण्याच्या नाबाद रनआऊट झाला. ईसूरू उदाना 4 धावा करून श्रेयस अय्यरकडे नॉर्टजेच्या चेंडूवर बाद झाला.

दरम्यान, या सामन्यासाठी दिल्ली संघात तीन बदल करण्यात आले आहेत. अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्सचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला असून त्यांच्या जागी शिमरॉन हेटमायर, हर्षल पटेल आणि प्रवीण दुबे यांना वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, आरसीबीने नवदीप सैनीच्या जागी शिवम दुबे आणि गुरकीरत सिंह मानच्या जागी शाहबाज अहमदची निवड केली आहे.