रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

DC vs RCB, IPL 2020: इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या 'करो या मरो'च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royals Challengers Bangalore) आमने-सामने येणार आहेत. दिल्ली आणि बेंगलोर यांच्यातील आजचा सामना अबू धाबी (Abu Dhabi) येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली आणि बेंगलोरने आजच्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. आजच्या सामन्यातील विजयी संघ थे प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल आणि दुसरे स्थान मिळवेल, तर पराभूत झालेल्या संघासाठी प्ले ऑफचा रास्ता खडतर होईल. आयपीएलच्या नियमांनुसार, अव्वल-2 मधील संघाना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन संधी मिळतात. मुंबई इंडियन्स पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई यंदाच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला आणि एकमेव संघ आहे, तर अन्य तीन जागांसाठी चार संघांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. (RCB vs DC, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

आजच्या सामन्यासाठी दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. दिल्लीने आजच्या महत्वाच्या सामन्यासाठी अजिंक्य रहाणे, डॅनियल सॅम्स आणि अक्षर पटेल यांचा समावेश केला असून हर्षल पटेल, शिमरॉन हेटमायर आणि प्रवीण दुबे यांना बाहेर केले आहे. रहाणेला संधी दिल्याने दिल्लीसाठी शिखर धवनसह तो डावाची सुरुवात करू शकतो. दुसरीकडे, आरसीबीने देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. नवदीप सैनी आणि गुरकीरत सिंह मान यांच्या जागी शाहबाझ नदीम आणि शिवम दुबे यांना संधी दिली आहे.

पाहा दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, डॅनियल सॅम्स, अक्षर पटेल,  रविचंद्रन अश्विन, एनरिच नॉर्टजे आणि कगिसो रबाडा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलिअर्स (विकेटकीपर), जोश फिलिप, देवदत्त पडिक्क्ल, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, मोहम्मद सिराज, शाहबाझ नदीम, वॉशिंग्टन सुंदर, ईसूरु उदाना आणि युजवेंद्र चहल.