रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

RCB vs DC, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्या आयपीएल 2020 प्ले ऑफच्या (IPL PlayOffs) स्थानासाठी मनोरंजक लढत पाहायला मिळेल. बेंगलोर आणि दिल्ली यांच्यातील जिंकणारा संघ थेट प्ले ऑफमध्ये पोहचेल तर अन्य संघाला अंतिम-4 च्या तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागेल. दिल्ली आणि आरसीबी (RCB) यांच्यातील आजचा सामना अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. रॉयल चॅलेंजर्स आणि कॅपिटल्सचा आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे 7:00 वाजता होईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना भारतीय प्रेक्षक स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स स्पर्धेबाहेर; KKRची चौथ्या स्थानी झेप)

आयपीएलच्या गुणतालिकेत आजवर तीन संघ -बेंगलोर, दिल्ली आणि कोलकाता यांचे प्रत्येकी 14 पॉईंट्स असून सनरायझर्स हैदराबादचा एक सामना शिल्लक आहे आणि त्यांनी तो जिंकल्यास प्ले ऑफमधील संघांची निवड अखेर नेट रनरेटच्या आधारावर केली जाईल. बेंगलोरला मागील तीन आणि दिल्लीला मागील सलग चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत हा संघ प्ले ऑफसाठी कसा पात्र ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पाहा आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: आरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कॅप्टन), एबी डिविलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झांपा, ईसूरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), हर्षल पटेल, कीमो पॉल, एनरिच नॉर्टजे, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मोहित शर्मा.