DC vs MI, IPL 2020: गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे पण आज इंडियन प्रीमियर लीगच्या 51व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) ते विजय मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार किरोन पोलार्डने (Kieron Pollard) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आजचा सामना मुंबईचा आयपीएलमधील (IPL) 200वा सामना आहे. मुंबईने प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले असले तरी सामन्यात विजय मुळवून ते पहिले स्थान कायम ठेवू पाहतील, तर दिल्लीला आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास त्यांच्यासमोर प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पाडण्याचे संकट आहे. अशा स्थितीत दोंघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. (DC vs MI, IPL 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अद्यापही दुखापतीमुळे बाहेर आहे अशा स्थितीत ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. मुंबईने हार्दिक पांड्या आणि जेम्स पॅटिन्सनला विश्रांती दिली असून त्यांच्या जागी जयंत यादव आणि नॅथन कुल्टर-नाईलचा समावेश केला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि तुषार देशपांडे यांच्याजागी पृथ्वी शॉ, हर्षल पटेल आणि प्रवीण दुबे यांचा समावेश केला आहे. प्रवीणचा आयपीएलमधील हा पहिला सामना असेल.
पाहा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, श्रेयस अय्यर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, हर्षल पटेल, आर अश्विन, एनरिच नॉर्टजे, प्रवीण दुबे आणि कगिसो रबाडा.
मुंबई इंडियन्स: सौरभ तिवारी, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जयंत यादव, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.