Shubman Gill वर धोक्याची टांगती तलवार, आता Sarfaraj Khan ला संधी देण्याची वेळ!
Shubman Gill (Photo credit - X)

IND vs ENG 2ndTest: शुभमन गिलने (Shubman Gill) पुन्हा एकदा तेच केले ज्याची भीती वाटत होती. म्हणजेच चांगल्या सुरुवातीनंतर त्याने आपली विकेट गमावली. शुभमनने तिसऱ्या क्रमांकावर खेळायला सुरुवात केली तेव्हापासून त्याच्यासोबत हेच घडत आहे. त्याच्या बॅटमधून सतत धावा येत नाहीहेत. अशा स्थितीत या मालिकेतील आगामी सामन्यांमध्ये त्यांच्यावर आता धोक्याची टांगती तलवार आहे. दरम्यान, सरफराज खानचा (Sarfaraj Khan) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र आजच्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत शुभमनला डावलून सरफराजला संधी देण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा आपल्या आवडत्या गिलला आपला बळी बनवला.

नाणेफेक भारताच्या बाजूने

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आज भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी मैदानात उतरली, ज्यानी चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांच्या शैलीच्या उलट रोहित आणि जैस्वाल थोडे संथ खेळत होते. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने गोलंदाजीसाठी पदार्पण करणाऱ्या शोएब बशीरकडे चेंडू सोपवला. त्याने तिसऱ्याच षटकात पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेत खळबळ उडवून दिली. संघाची एकूण धावसंख्या 40 धावांवर असताना त्याने 14 धावा करून खेळत असताना रोहित शर्माला बाद केले. यानंतर पहिल्याच सत्रात शुभमन गिलला फलंदाजीसाठी यावे लागले.

शुभमन गिलला पुन्हा मोठी खेळी खेळता आली नाही

शुभमन गिल फलंदाजीला आला तेव्हा त्याने सुरुवातीला काही चांगले शॉट्स खेळले आणि आज तो मोठी खेळी खेळेल असे वाटत होते. पण यानंतर जे भीती वाटत होती तेच घडलं. म्हणजेच आपल्या चांगल्या सुरुवातीचे त्याला मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. संघाची धावसंख्या 89 धावांवर असताना जेम्स अँडरसनने गिलचा डाव संपवला. यावेळी गिलला 46 चेंडूत केवळ 34 धावा करता आल्या. त्यात 5 चौकारांचा समावेश होता. या सामन्यातील अँडरसनची ही पहिली विकेट होती. (हे देखील वाचा: Rajat Patidar Debut: रजत पाटीदारचे उघडले नशीब, कसोटी पदार्पणाची मिळाली संधी; झहीर खानने दिली कॅप (Watch Video)

अँडरसनने आतापर्यंत 5 वेळा गिलला केले बाद 

गिलने जेम्स अँडरसनसमोर नेहमीच अडचणींचा सामना केला, मग तो ओपनिंग असो वा तिसऱ्या क्रमांकावर असो. शुभमन गिल आणि जेम्स अँडरसन यांनी आतापर्यंत सात डावांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये शुबमनने अँडरसनसाठी 72 चेंडू खेळले असून यामध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 39 धावा आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या सात डावांपैकी अँडरसनने गिलला ५ वेळा बाद केले आहे. सरासरीबद्दल बोलायचे झाले तर अँडरसनसमोर गिलची सरासरी केवळ 7.80 आहे. यावरून अँडरसनसमोर गिलला किती त्रास होतो हे समजू शकते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आता या सामन्याच्या दुसऱ्या डावात गिल आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.