IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) रजत पाटीदारला (Rajat Patidar) या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली आहे. रजत पाटीदारला भारताचा महान वेगवान गोलंदाज झहीर खानने टेस्ट कॅप दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रवींद्र जडेजाच्या जागी जखमी केएल राहुल, रजत पाटीदार आणि कुलदीप यादव खेळतील, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी मुकेश कुमारचा समावेश करण्यात आला आहे. (हे देखील वाचा: Ravi Ashwin Stats & Records: इंग्लंडविरुद्ध आर अश्विन करू शकतो मोठा पराक्रम, 'या' विक्रमांवर राहणार लक्ष)
पाहा व्हिडिओ
That Test Debut feeling 😃👌
🎥 When Rajat Patidar received his cap from former #TeamIndia pacer, Zaheer Khan 👏👏#INDvENG | @rrjjt_01 | @ImZaheer | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gyYIdxVGmp
— BCCI (@BCCI) February 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)