CSK Vs RR, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
CSK vs RR (Photo Credits: File Image)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 37व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा संघ (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शेख जायद स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधार पद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

या हंगामात चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघाला चांगली कामगिरी बजावता आली नाही. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ सातव्या तर, राजस्थानचा संघ आठव्या स्थानी आहे. दोन्ही संघाने 9 सामने खेळले असून केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 6 सामन्यात पराभूत झाले आहेत. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. हे देखील वाचा- MI vs KXIP IPL 2020 - The Best T20 Match Ever: दोन सुपर ओव्हर्सच्या रंगतदार सामन्यात गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डर्सने केली उत्कृष्ट कामगिरी

संघ-

चेन्नई सुपर किंग्ज:

एमएस धोनी (कर्णधार), एम विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चहर, पियुष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम करण, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतूराज गायकवाड, कर्ण शर्मा

राजस्थान रॉयल्स:

जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अॅन्ड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरर, ओशान थॉमस, रियान पराग, यशस्वा जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर