मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

MI vs KXIP IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यातील आयपीएल (IPL) 2020 चा रविवार, 18 ऑक्टोबर रोजी झालेला सामना आजवरचा सर्वोत्कृष्ट टी-20 सामना होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात पहिले सामना बरोबरीत सुटल्यामुळे निकाल सुपर ओव्हरवर गेला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईसमोर विजयासाठी अवघ्या 6 धावांचं आव्हान होतं, पण ही सुपर ओव्हरही अनिर्णित राहिल्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ज्यामध्ये पंजाबने विजयासाठी आवश्यक असलेल्या 12 धावांचं आव्हान पूर्ण करत अखेरीस विजय निश्चित केला. टी-20 मध्ये एका सामन्यात दोन सुपर ओव्हर आणि एकाच दिवशी 3 सुपर ओव्हर खेळण्याची देखील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी, सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) सामन्याचा निकालही सुपर ओव्हरमधेच लागला. (IPL 2020: 'सुपर संडे' स्पेशल! आयपीएल स्पर्धेत एकाच दिवशी 3 Super Over, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा एकाच सामन्यात खेळण्यात आल्या 2 सुपर ओव्हर)

मात्र, हैदराबाद-कोलकाता, मुंबई-पंजाबमधील सामना सर्वोत्कृष्ट टी-20 सामन्यांपैकी एक होता यात शंका नाही. या सुपर ओव्हर सामन्यात चारही टीमच्या खेळाडूंनी मग ते फलंदाज असो किंवा गोलंदाज किंवा फिल्डर्स सर्वांनी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्याने मनोरंजनाची पातळीचं गाठली आणि चाहत्यांना दोन सुपर ओव्हरचा अनुभव मिळाला. मुंबई आणि पंजाब यांच्यामध्ये पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय झाला.सामना टाय होण्यापूर्वी पंजाबला एका चेंडूत 2 धावांची गरज असताना ट्रेंट बोल्टने जबरदस्त यॉर्कर टाकला ज्याच्यावर क्रिस जॉर्डन आणि दीपक हुडाने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण दुसरी धाव घेत असताना जॉर्डन धावबाद झाला आणि सामना अनिर्णित राहिला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पंजाबला 5 धावाच करता आल्या. या दरम्यान बुमराहने शिस्तबद्ध गोलंदाजी केली. पण पहिली सुपर ओव्हर अनिर्णित राहिली. आणि अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने 6 चेंडूत 11 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर मयंक अग्रवालने जबरदस्त फिल्डिंगचे प्रदर्शन केले आणि किरोन पोलार्डने मारलेला षटकार वाचवला जेणे करून मुंबईला फक्त 2 धावाच मिळाल्या. पोलार्डने मारलेला तो षटकार रोखण्यास जर मयंक अपयशी ठरला असता तर कदाचित मुंबईने 11हुन अधिक स्कोर केल्या असत्या जो पार करणे पंजाबसाठी कदाचित कठीण होऊन बसले असते.

यापूर्वीही सामन्याच्या सुरुवातीला पंजाबच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी झाली. आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली, क्विंटन डी कॉकने संयम ठेवून डाव खेळला आणि अर्धशतक ठोकले. दरम्यान, मुंबई आणि कोलकाताचा आयपीएलमधील सामना रोमांचक होता हे मात्र नक्की. अखेर कोणतीही टीम जिंकली असली तरी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी चाहत्यांनी भरपूर मनोरंजनासह पैसावसूल कामगिरी बजावली.