रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि दमछाक करणारे क्षेत्ररक्षण ही कधीही न संपणारी प्रेमकथा आहे. क्षेत्ररक्षण करताना जाडेजा क्वचितच प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक, जडेजाने बुधवारी अबु धाबी येथे आयपीएल (IPL) 2020च्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध (Kolkata Knight Riders) शानदार झेल टिपण्यासाठी सीएसके सहकारी फाफ डू प्लेसिससह (Faf du Plessis) उत्कृष्ट टीमवर्क दर्शवला व केकेआरच्या (KKR) घातक सुनील नारायणला स्वस्तात माघारी पाठवले. 11 व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूमध्ये हे घडले. पहिल्या चार सामन्यात सलामीवीर म्हणून कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला वेस्ट इंडिज खेळाडू आजच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पण इथे देखील तो प्रभाव पाडण्यात अयशस्वी राहिला. नारायणचा फॉर्म केकेआरसाठी (KKR) चिंतेची बाब बनला होता, ज्यामुळे आजच्या सामन्यात टीमने त्याचा फलंदाजी क्रमच बदलला. (KKR vs CSK, IPL 2020: राहुल त्रिपाठीचे संयमी अर्धशतक, ब्रावोच्या 150 आयपीएल विकेट्स; नाईट रायडर्सचे 167 धावांवर ऑलआऊट)
11व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर विंडीज फलंदाजाने मोठा फटका मारण्याच्या हेतून शॉट हवेत मारला, पण क्षेत्ररक्षणात चपळ असलेल्या जडेजाने सीमारेषेवर उडी मारली केकेआर फलंदाजांचा झेल पकडला, पण हात बाउंड्री लाईनला लागत असल्याचे कळताच जडेजाने चेंडू डु प्लेसिसच्या दिशेने टाकला आणि केकेआरचा धक्का दिला. पाहा हा व्हिडिओ:
Jadeja catches, Faf completes!
The Jadeja-Faf tag team catch. Catching brilliance on display here. You cannot miss this.https://t.co/R5Xi2XhpMR #Dream11IPL
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2020
जडेजा आणि डु प्लेसिसचा टीम कॅच पाहून नेटकरी देखी; अवाक झाले. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया...
हरभजन सिंह
Cheeeeettaaaaaaa 🐆 jaddu @imjadeja catch 👏👏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 7, 2020
जबरदस्त!!
Jadeja took a stunning running catch and passed it to Faf Du Plessis at the end near rope. World's top 2 Fielders contributing for a catch. One of the best catching moments ❤ #CSKvsKKR pic.twitter.com/8etTvKl0Q0
— ᏒᎧᎷᏋᎧ 🇮🇳 (@Romeo_theboss) October 7, 2020
सर जडेजा!
Great Catch Sir Jadeja 🙌🙏 #KKRvsCSK pic.twitter.com/IlzXHNIQs7
— Oggy Billa 💙 (@SirOggyBilla) October 7, 2020
आकर्षक !!
Ravindra Jadeja grabs a stunner near the boundary rope.
#KKRvsCSK pic.twitter.com/mWTIhALIwo
— Fake Gandhi (@FakeGandhi_1) October 7, 2020
असाधारण!
When two best fielders meets,
It's a OUT 😅🔥#Jadeja #Fafduplesis #IPL2020 #KKRvsCSK pic.twitter.com/U8wdFKIIXm
— ViNiTh (@Vinith_Offl) October 7, 2020
दुसरीकडे, आजच्या सामन्यात टॉस जिंकून केकेआरने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सीएसके गोलंदाजांसमोर केकेआरचे फलंदाज मोठा खेळ करू शकले नाही. सलामी फलंदाज राहुल त्रिपाठीला वगळता अन्य फलंदाज मोठा डाव खेळण्यास अपयशी ठरले. राहुल 81 धावा करून बाद झाला. सीएसके गोलंदाजांनी केकेआरला 167 धावांवर ऑलआऊट केले.