राहुल त्रिपाठी (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 167 धावांवर ऑलआऊट झाली आणि सीएसकेसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले. केकेआर आणि सीएसके यांच्यातील आजचा सामान अबू धाबी येथे खेळला जात आहे. केकेआरकडून सलामी फलंदाज राहुल त्रिपाठीने संयमी खेळ करत अर्धशतकी डाव खेळला. राहुल 81 धावा करून बाद झाला. सुनील नारायण 17, शुभमन गिल 11, नितीश राणा 9 आणि इयन मॉर्गन 7 धावा करून बाद झाले. केकेआरकडून आजच्या सामन्यात देखील आंद्रे रसेल अयशस्वी राहिला आणि फक्त 2 धावा केल्या. दुसरीकडे, सीएसकेकडून ड्वेन ब्रावोने 3, कर्ण शर्मा, सॅम कुरन आणि आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. विकेटच्या मागे शिवम मावीचा कॅच घेत ब्रावोने आयपीएलमध्ये 150 विकेटचा टप्पा गाठला. हा टप्पा पूर्ण करणारा ब्रावो पाचवा गोलंदाज आहे.(CSK vs KKR, IPL 2020: दिनेश कार्तिकने जिंकला टॉस, KKR करणार पहिले फलंदाजी; CSK प्लेइंग इलेव्हनमध्ये झाला 'हा' एक बदल)

केकेआरकडून सलामीवीर शुभमन गिल आणि राहुल यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. मात्र, गिल अवघ्या 11 धावा काढून बाद झाला. मागील सामन्यात आठव्या क्रमांकावर खेळणार्‍या त्रिपाठीला सुनील नारायणच्या जागी सलामीला पाठविण्यात आले होते आणि ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्रिपाठीने अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. केकेआरने 9व्या ओव्हरदुसरी विकेट गमावली. नितीश राणाला केवळ 9 धावा करता आल्या. केकेआरने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 93 धावा केल्या. नारायणच्या रूपात केकेआरला तिसरा धक्का बसला. वेस्ट इंडिज खेळाडूने 17 धावांचे योगदान दिले. मॉर्गन देखील यंदा जास्त धावांचे योगदान देऊ शकला नाही आणि केवळ 7 धावांवर बाद झाला. रसेलला देखील फक्त 2 धावा करता आल्या.

विजयपथावर परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या केकेआरने संघात कोणताही बदल केलेला नाही, तर शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर 10 गडी राखून विजय मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्जने संघात एक बदल केला. सीएसकेने पियुष चावलाच्या जागी कर्ण शर्माला संधी दिली आहे. कर्णने आजच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत 2 गडी बाद केले.