चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

CSK vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सामना करण्यासाठी सज्ज आहेत. केकेआरचे नेतृत्व दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि सीएसकेचे नेतृत्व एमएस धोनी (MS Dhoni) करत आहे. आजच्या सामन्यात केकेआरचा (KKR) कर्णधार कार्तिकने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल झाला नसून सीएसकेने पियुष चावलाच्या जागी कर्ण शर्माला संधी दिली आहे. केकेआर आणि सीएसकेमधील (CSK) आजचा सामना अबू धाबीच्या शेख ज़ायद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात एकीकडे सीएसके आपली विजयी कामगिरी कायम ठेवू पाहत असेल, तर  दुसरीकडे केकेआर मागील सामन्यातील पराभव मागे सोडून विजय पथावर परतण्याचा प्रयत्न करतील. सीएसकेसाठी सकारात्मक बाब म्हणजे त्यांचे दोन्ही सलामी फलंदाज लयीत परतले आहेत, तर केकेआरचे फलंदाज अजूनही संघर्ष करत आहेत. (IPL 2020: KKRला धक्का, एकही सामना न खेळता USAच्या अली खानने घेतली माघार, जाणून घ्या कारण)

फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनची जोडी सीएसकेच्या डावाची सुरुवात करतील. अंबाती रायुडू तिसऱ्या, धोनी चौथ्या आणि केदार जाधव पाचव्या स्थानी फलंदाजी करेल. रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावोच्या रूपात टीमकडे जबरदस्त अष्टपैलू उपस्थित आहेत. दीपक चाहर, सॅम कुरन आणि शार्दूल ठाकूर वेगवान गोलंदाजी सांभाळतील. पियुष चावला आणि जडेजा फिरकी विभाग संभाळतील. दुसरीकडे, केकेआरकडून शुभमन गिल आणि सुनील नारायणची जोडी सलामीला येतील. मागील काही सामन्यात नारायण फ्लॉप ठरला असला तरी शुभमन चांगल्या लयीत दिसत आहे. मात्र आंद्रे रसेलचा फॉर्म टीमसाठी चिंतेची बाब बनली आहे. केकरसाठी इयन मॉर्गनने प्रभावी कामगिरी बजावली आहे आणि आजच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

पाहा सीएसके आणि केकेआरचा प्लेइंग इलेव्हन

सीएसके इलेव्हन: एमएस धोनी (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, केदार जाधव, रवींद्र जडेजा, सॅम कुर्रान, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, कर्ण शर्मा आणि शार्दुल ठाकूर.

केकेआर इलेव्हन: दिनेश कार्तिक (कर्णधार), शुभमन गिल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, कुलदीप यादव, संदीप वारियर, शिवम मावी आणि कमलेश नगरकोटी.