भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्ती घेतली. हा सामना कुकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना ओव्हलच्या मैदानावर रंगला त्यामुळे कूकच्या निवृत्तीला खास महत्त्व आलं आहे. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले शेवटचे सामने ओव्हलच्या मैदानावर खेळले आहेत. त्यामध्ये आता अॅलिस्टर कुकचही नावं समाविष्ट झालं आहे.
ओव्हलच्या मैदानावर शेवटचा सामना खेळलेले दिग्गज खेळाडू ?
सर डॉन ब्रॅडमन :
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी निवृत्ती ओव्हलवरच घेतली. १९४८ साली इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेत ते अखेरचा सामना खेळले. या सामन्यात मात्र ते पहिल्यांदा शून्यावर बाद झाले होते.
व्हिव्हियन रिचर्डस, माल्कम मार्शल, जेफ ड्युजोन :
वेस्ट इंडिजचा संघा माजी कर्णधार व्हिव्हियन रिचडर्स, माल्कम मार्शल आणि जेफ ड्युजोन या तिघांचाही शेवटचा सामना ओव्हलवर रंगला होता. १९९१ साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ओव्हलवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली होती.
कर्टली एम्ब्रोस :
वेस्ट इंडिजचा बॉलर कर्टली एम्ब्रोस यांनीसुद्धा २००० साली आपला अखेरचा सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला होता.
माईक आथर्टन आणि अॅलेक स्टुअर्ट :
इंग्लंडचा माईक आथर्टन २००१ साली ओव्हलवरच अखेरचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेक स्टुअर्ट २००३ मध्ये याच मैदानावर अखेरचा सामना खेळले होते .
अॅण्ड्रयू फ्लिंटॉफ :
इंग्लंडचा ऑल राउंडर अॅण्ड्रयू फ्लिंटॉफ यांने २००९ साली ओव्हलवरच आपला अखेरचा सामना खेळला होता.
मायकल क्लार्क :
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यानेही २०१५ मध्ये याच मैदानावर आपला अखेरचा सामना खेळला होता.