Ravi Shastri ( Photo Credit: Twitter)

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी भारतीय चाहत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. शास्त्रीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना फिट इंडिया मुमेंट आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये शास्त्रींनीं 2 ऑक्टोबरला चाहत्यांना 2 किमी. पळून जाऊन रस्त्यात सापडलेल प्लास्टिक गोळा करून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकण्यास सांगितले. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त क्रीडा मंत्रालयने फिट इंडिया ब्लॉग रन आयोजित करीत आहे. टीम इंडियादेखील मोठ्या उत्साहाने स्वच्छता अभियानात भाग घेतला होता. 2016 मध्ये टीम इंडियाने कोलकाता कसोटीदरम्यान 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. (IND vs SA 1st Test Day 1: टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय; रोहित शर्मा याच्यावर लक्ष)

ट्विट शेअर करत 51 वर्षीय शास्त्रींनीं ‘राष्ट्रपिता’- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा द्यावा आणि दोन किमी रनमध्ये भाग घेण्यासाठी चाहत्यांना आवाहन केले. शास्त्रींनी लोकांना धावताना वाटेतील कचरा उचलून कचराकुंडीत टाकण्याची विनंतीदेखील केली. पण, गांधी जयंतीवर पोस्ट शेअर करत शास्त्री स्वतः फसले. आणि क्रिकेट चाहत्यांनी वेळ वाया न घालवता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला धारेवर धरले आणि मजेदार अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्यातील काहींनी त्याला आठवण करून दिली की 2 ऑक्टोबरला 'ड्राय डे' आहे, तर काहींनी त्यांना रस्त्यावरील व्हिस्कीच्या बाटल्या उचलण्यास सांगितले आणि त्या सोडू नयेत असे सांगितले.

रवी शास्त्री यांचे ट्विट

नेटकर्ण्यांनी घेती शास्त्रींची फिरकी

धावताना व्हिस्कीची बाटली देखील उचला

गांधींचा वाढदिवस हा 'ड्राय डे' आहे

हा बेवडा गांधी जयंती साजरी करतोय

भाऊचा बफर स्टॉक असतो इमरजेंसी साठी

यशस्वी कारकीर्दीनंतर शास्त्रींना यावर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्रींची निवड केली. कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या वादानंतर शास्त्रींनीं 2017 मध्ये अनिल कुंबळे यांची जागा घेतली होती. शास्त्री यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये वाजवी कामगिरी केली आहे.