IND vs SA 1st Test Day 1: टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय; रोहित शर्मा याच्यावर लक्ष
(Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात आजपासून विशाखापट्टणम येथे पहिली टेस्ट मॅच सुरु होत आहे. आजच्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅचच्या एक दिवसाआधी टीम इंडियाने त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनची घोषणा केली होती. रिषभ पंत याला वगळले आहेत, तर रवींचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकीकडे पंतला प्रभावी खेळी करता आली नाही आणि त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाला धक्का लागला आहे. दुसरीकडे, अश्विनला विंडीजविरुद्ध संघात असूनही प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आजवर भारतात झालेल्या सामन्यात आफ्रिका संघाला एकदाही विजय मिळवता आला नाही. दक्षिण आफ्रिका संघ 2015 मध्ये भारतात चार कसोटी मालिका खेळण्यासाठी आले होते. यात भारताने निर्विवाद वर्चस्व राखत 3-0 असा विजय मिळवला होता. (Live Streaming of IND vs SA, 1st Test Day 1: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

केएल राहुल याच्या सतत अपयशामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सराव सामन्यात रोहित काही खास करू शकला नाही आणि शून्यावर बाद झाला. पण, खऱ्या परीक्षेच्यावेळी तो कसा खेळ करतो यावर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.  दरम्यान, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. विंडीजला त्यांच्याच मैदानावर पराभूत करत भारत 120 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. आणि आता दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टीम इंडिया आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याच्या निर्धारित असेल.

असा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, अजिंक्य राहणे, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका संघ: एडन मार्करम, डीन एल्गार,  फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), टेंबा बावुमा (उपकर्णधार), थेउनिस डि ब्रुइन, क्विंटन डी कॉक, वर्नोन फिलैंडर, सेनुरन मुथुसामी, केशव महाराज, डेन पायटेड, आणि कागिसो रबाडा.