निकोलस पूरनने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (Caribbean Premier League) सलग तीन चेंडूंत षटकार खेचत या हंगामातले पहिले शतक झळकावले. रविवारी सेंट किट्स आणि नेव्हिस (St. Kitts and Nevis) यांच्यावर गयाना अमेझॉन वॉरियर्समध्ये (Guyana Amazon Warriors) झालेल्या सामन्यात पूरनच्या शतकी खेळीच्या जोरावर गयानाने 7 विकेटने विजय मिळवला. पूरनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक ठरले. सीपीएलमध्ये (CPL) आजवरच्या सर्वात जलद शतकी खेळीत पूरनने 45 चेंडूच्या खेळीत 10 षटकार आणि चार चौकार ठोकले. पूरनने न्यूझीलंडचा रॉस टेलरसह 71 चेंडूत 128 धावांची भागीदारी केली. टेलरने नाबाद 25 धावा केल्या. पूरनने शतक पूर्ण करण्यासाठी ईश सोढीच्या (Ish Sodhi) ओव्हरमध्ये सलग तीन षटकार ठोकले. 18 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पूरने मिड-विकेटवर षटकार ठोकला, त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक्सट्रा कव्हरकडे षटकार मारत 94 धावांवर पोहचला आणि अखेरीस डीप मिड-विकेटवर तिसऱ्या षटकारासह स्पर्धेत पहिल्यांदा तिहेरी संख्या गाठली. (CPL 2020: कॅच पकडायला गेलेल्या रोव्हमन पॉवेलची बाउंड्रीवर झाली वीरसामी पर्मुलबरोबर जोरदार टक्कर, पण पकडला क्लासिक झेल Watch Video)
सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 150 धावा करू शकला. जोशुआ डिसिल्वाने 46 चेंडूत 59 धावा केल्या होत्या, तर दिनेश रामदिन 30 चेंडूंत 37 धावांवर नाबाद राहिला. यानंतर, प्रत्येकाला वॉरियर्सकडून जिंकण्याची अपेक्षा केली, परंतु 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाज शतक ठोकेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. इतकंच नाही तर टी-20 सामन्यात अशा निम्न स्कोअरचा पाठलाग करतानाही चौथ्या क्रमांकावर शतक ठोकणे सोपे नाही, पण पूरनने आपल्या तुफान फलंदाजीने सर्वांना चकित केले. पूरनाने 45 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 222.2 होता.
CENTURION!!! What an innings by Nicholas Pooran.👏👏👏 #CPL20 #SKPvGAW #CricketPlayedLouder pic.twitter.com/cpXM775mW6
— CPL T20 (@CPL) August 30, 2020
दुसरीकडे, या विजयामुळे वॉरियर्सचा तीन पराभवाची लिंक तुटली आणि गुणतालिकेत आता ते तिसऱ्या स्थानावर पोहचले. गयाना टीमने आजवर 7 सामने खेळले ज्यातील 3 मध्ये विजय तर 4 मध्ये पराभव पत्करावा लागला. ट्रिनबागो नाइट रायडर्स सहा सरळ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. सेंट लुसिया झुक्स दुसऱ्या स्थानी आहेत. मागील सामन्यात झुक्सने बार्बाडोस ट्राइडेंट्सला तीन धावांनी पराभूत करत लो-स्कोअरिंग सामन्यात 92 धावांचा बचाव केला. मंगळवारी नाईट रायडर्सचा जमैका तैलवाह आणि गयानाचा बार्बाडोसविरुद्ध आमना-सामना होईल.