ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंडमध्ये (New Zealand) आजपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये (Sydney Cricket Ground) झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी पराभूत केले. आजकाल जगातील क्रीडांगणावर कोरोना विषाणूचा परिणाम दिसून येत आहे. या सामन्यावरही याचा परिणाम दिसला. सामना रिक्त मैदानात प्रेक्षांशिवाय खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान एकही प्रेक्षक मैदानात दिसत नाही. दरम्यान, या सामन्या संबंधित एक मोठी बातमीही येत आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनची (Kane Richardson) कोरोना विषाणूची (Coronavirus) तपासणी करण्यात आली. ज्याबद्दल प्रत्येकजण घाबरला होता. पण त्याच्या अहवालामुळे संघाला दिलासा मिळाला. रिचर्डसनची टेस्ट नकारात्मक आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिले संघातील उर्वरित खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून रिचर्डसनला खेळाडूंपासून वेगळे ठेवले होते. (AUS vs NZ: ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनची करण्यात आली कोरोनाव्हायरस टेस्ट)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, “केन रिचर्डसनचीकोरोना टेस्ट नकारात्मक आली आहे आणि तो मैदानात आहे.” कोरोना विषाणू संशयित असल्याने त्याला आज न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. टेस्ट नकारात्मक आल्यावररिचर्डसन मैदानावर आला आणि संघाशी जुडला. cricket.com.au नेरिचर्डसनचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याचे स्वागत केले. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध मालिकेनंतर त्याने घसा खवखवण्याची तक्रार केली होती, ज्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला वैद्यकीय संघाकडे तपासणीसाठी पाठवले.
केन रिचर्डसनची कोरोना विषाणू टेस्ट नकारात्मक
JUST IN: Kane Richardson's test for COVID-19 has come back negative and he is on his way to the ground.#AUSvNZ
— cricket.com.au (@cricketcomau) March 13, 2020
रिचर्डसन परतला
Kane Richardson is back! 🙌#AUSvNZ pic.twitter.com/KJloipHQzd
— cricket.com.au (@cricketcomau) March 13, 2020
यापूर्वी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील वनडे मालिकेतील सर्व सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सामन्यासाठी ज्यांनी तिकिटांची खरेदी केली त्या सर्वांना पैसे परत देण्यात येतील. हजारो लोकांना प्रभावित करण्याव्यतिरिक्त, या विषाणूमुळे 4000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर खेळाचे बहुतेक सामने एकतर रद्द केले गेले किंवा बंद दाराच्या मागे म्हणजेच प्रेक्षकांविना आयोजित करण्यात येत आहेत.