Coronavirus ब्रेक नंतर मैदानावर परतले सुरेश रैना आणि रिषभ पंत, सुरु केली नेट प्रॅक्टिस, पाहा Video
रिषभ पंत आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतलं आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतातील क्रिकेट (Indian Cricket) स्पर्धांवर अजूनही ब्रेक लावण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारतीय खेळाडूंना आता मैदानावर परतण्याची प्रतीक्षा आहे. काही भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्तिशः ओउटडोर प्रशिक्षण सुरू केले आहे, परंतु बहुतेक क्रिकेट अजूनही घरातील कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहे. अनुभवी क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याने काही दिवसांपूर्वी सरावाला सुरुवात केली, पण सोमवारी मात्र त्याला युवा फलंदाज रिषभ पंतची (Rishabh Pant) साथ मिळाली आणि दोघांनी गाझियाबाद मधील क्रीडा संकुलात नेट्समध्ये सराव केला. रैनाने या दोघांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. गाझियाबादमध्ये कोरोना विषाणूची तीन हजारांहून अधिक रुग्णांची पुष्टी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यन, भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि इशांत शर्मा या स्टार खेळाडूंनीही रैना आणि पंतच्या आधी नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे. (ICC टूर्नामेंट्सची बाद फेरी गाठण्यात टीम इंडिया अयशस्वी का? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी कारण केलं स्पष्ट)

33 वर्षांच्या रैनाने "मेहनत करा, कधीही हार मानू नका व फळ मिळणार नाही" या कॅप्शनसह पोस्ट शेअर केली. या व्हिडिओमध्ये दोन्ही फलंदाज एका पाठोपाठ फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

पाहा रैना आणि पंतच्या सरावाचा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

दुसरीकडे, कोविड-19चा सर्वात वाईट परिणाम होणारा भारत जगातील तिसरा देश आहे. आयपीएल 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. मात्र, बीसीसीआय देशात क्रिकेट स्पर्धा सुरु करण्याच्या प्रयत्नात असून कोरोनामुळेअद्याप परिस्थिती निर्माण होत नाही. दरम्यान, रिषभ पंत अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर खेळला होता. या दौर्‍यावर कोणत्याही वनडे आणि टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान देण्यात आले नव्हते. टीम मॅनेजमेंटने पंतच्या जागी केएल राहुलवर विश्वास दाखवला. वनडे आणि टी-20 मध्ये राहुलने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली होती. भारताला वनडे मालिकेत 3-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले, तर टी-20 मालिकेत त्यांनी 5-0 ने विजय मिळवला.