जगातील क्रीडा विश्वावर कोरोना विषाणूचा (Coronavirus) परिणाम होत आहे. न्यूझीलंडचा (New Zealand) क्रिकेट संघ आजकाल ऑस्ट्रेलियन (Australia) दौर्यावर आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यामधील पहिला सामना 13 मार्च रोजी सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळला गेला. आणि पहिल्या सामन्यानंतर कीवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन (Lockie Ferguson) याची कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आली. अद्याप फर्ग्युसनच्या टेस्टचा कोणतेही अहवाल नाहीत आणि सध्या त्याला अन्य टीम सदस्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात फर्ग्यूसनला घशात खवखव लागल्याची तक्रार केल्यावर 24 तासांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे न्यूझीलंड हेरल्डच्या अहवालात म्हटले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनचीही कोरोना विषाणूची टेस्ट करण्यात आली होती ज्याचा अहवाल नकारात्मक आला होता. या दोन्ही खेळाडूंनी घशात खवखवणे आणि तक्रार केली. (COVID-19: ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठा दिलासा, केन रिचर्डसनचे कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह)
किवी वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनात, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे: “शिफारस केलेल्या हेल्थ प्रोटोकॉलनुसार, पहिल्या वनडे सामन्याच्या शेवटी घशात खवल्याच्या तक्रारीनंतर लॉकी फर्ग्युसनला पुढील 24 तासासाठी टीम हॉटेलमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे.” न्यूझीलंड क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, फर्ग्युसनची कोरोना व्हायरससाठी तपासणी करण्यात आली होती आणि अहवाल नकारात्मक आल्यावरचं तो संघात शामिल होईल. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर पसरण्याची शक्यता टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एससीजीमध्ये प्रेक्षकांना परवानगी नसल्यामुळे दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना रिकाम्या स्टॉन्डमध्ये ठेवण्यात आला होता.
शुक्रवारी रिक्त सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 71 धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडने यापूर्वी 7 बाद 258 धावांवर रोखले पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजांनी 41 व्या षटकात 187 धावांवर ऑलआऊट केले आणि मालिकेत आघाडी घेतली.