कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका भारतीय क्रिकेटला बसला असून भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa ODI Series Called Off) यांच्यात होणारी एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 एकदिवसीय समान्याची मालिका खेळण्यात येणार होती. भारत आणि दक्षिण आफिका यांच्यातील पहिला सामना धर्मशाळा येथे खेळण्यात येणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांना आगामी दोन सामन्यांबद्दल उत्सुकता होती. परंतु, कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहून आणि खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी पुढील 2 सामने रिकाम्या मैदानात म्हणजेच प्रेक्षकांशिवाय खेळवला जाईल, असा निर्णय यापूर्वी बीसीसीआयने घेतला होता. मात्र, उर्वरित सामने रद्द करण्यात आल्याची माहिती पीटीआय वृत्त संस्थेने दिली आहे.

कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रिडा स्पर्धावरही झाला आहे. भारतातील लोकप्रिय लिग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे आयोजन देखील पुढे ढकल्यात आले आहे. यातच आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोना व्हायरचे संकट विचारात घेऊन बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना रद्द झाल्यानंतर पुढील दोन सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार असल्याची माहिती दिली होती. दुसरा एकदिवसीय सामना 15 मार्च रोजी लखनऊ तर, तिसरा आणि अखेरचा सामना 18 मार्च रोजी कोलकाता येथे खेळण्यात येणार होता. हे देखील वाचा- COVID-19: ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठा दिलासा, केन रिचर्डसनचे कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह

ट्वीट-

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल 2020 एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीसीसीआय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर सर्व संबंधित केंद्र व राज्य सरकार विभागांसह भारत सरकारबरोबर काम करेल. बहुप्रतिक्षित आयपीएलचे 13 वे सत्र 29 मार्चपासून सुरू होणार होते, परंतु कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. नवीन तारखा अजून जाहीर झाल्या नाही आहे. 15 एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूची स्थिती बदली नाही तर स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते किंवा रद्द होऊ शकते.