दानिश कनेरिया, युवराज-हरभजन सिंह (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा (Pakistan) माजी गोलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) यांनी भारतीय क्रिकेट स्टार्स युवराज सिंह (Yuvaj Singh) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाला सामोरे जाणाऱ्या त्याच्या देशातील अल्पसंख्याकांना मदत करण्यासाठी व्हिडिओ बनवण्याची विनंती केली. कोविड-19 (COVID-19) रोगाविरूद्ध लढाईत सामील झालेल्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला (Shahid Afridi Foundation) या दोघांनी पाठिंबा दिल्यानंतर काही दिवसांनी कनेरियान अपील केले आहे. यापूर्वी, जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी गरजूंना मदत करण्यासाठी हरभजन आणि युवी शाहिद आफ्रिदीसमवेत मदतीसाठी सामील झाले होते. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंच्या फाऊंडेशनला मदत केल्याबद्दल या दोन भारतीय क्रिकेटपटूंना चाहत्यांकडून सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले होते. शेजारचा देश पाकिस्तानमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. पाकिस्तानात राहणार्‍या बिगर-मुस्लिम लोकांची परिस्थिती खूपच वाईट आहे, म्हणूनच कनेरियाने भारतीय क्रिकेटर्सच्या मदतीची विनंती केली आहे. (Coronavirus: लॉकडाउनच्या काळात पाकिस्तानी हिंदू आणि ख्रिस्ती अल्पसंख्याकांसाठी शाहिद आफ्रिदीने घेतला पुढाकार, राशनचा केला पुरवठा)

दानिश हा हिंदु फिरकी गोलंदाज जो पाकिस्तानकडून खेळत होता. कराचीमध्ये जन्मलेल्या कनेरियाने लिहिले आहे, "युवराज आणि हरभजन सिंह यांनाही पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्यांकांसाठी व्हिडिओ बनविण्याची मी विनंती करतो. कोरोना व्हायरसच्या काळात त्यांना तुमची गरज आहे." पाकिस्तानचा माजी फिरकीपटू संघात हिंदू असल्याने भेदभावाबद्दल बोलला होता. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही दानिश यांना पाठिंबा दर्शवत म्हटले की तो हिंदू असल्याने त्याच्यासोबत पक्षपात व्हायचा.

दुसरीकडे, आफ्रिदी सध्या पाकिस्तानमधील कोरोनामुळे प्रभावित झालेल्या गरजू लोकांना मदत करत आहे. त्याने व्हिडिओच्या माध्यमातून हरभजन आणि युवी यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. यांच्या प्रत्युत्तरात भज्जी आणि युवीने त्याला समर्थन केले आणि ट्विटरद्वारे माहिती शेअर केली. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची मदत केल्याबद्दल या दोन भारतीय क्रिकेटपटूंची चाहत्यांनी टीका केला, पण दोघांनी टीकाकारांना यावर स्पष्टीकर जाहीर केले आणि कोणाच्याही भावना दुखावण्याची दोघांची भावना नसल्याचे त्यांनी म्हटले.