पाकिस्तानी हिंदू आणि ख्रिस्ती अल्पसंख्याकांसाठी शाहिद आफ्रिदीने घेतला पुढाकार (Photo Credit: Getty)

जाती-धर्माची बंधन तोडत माही पाकिस्तान (Pakistan) कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) कोविड-19 (COVID-19) च्या संकटकाळात आपल्या देशातील संघर्ष करणार्‍या अल्पसंख्यांकांसाठी रेशन मोहीम राबविली. आपल्या मातृभूमीतील गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करण्यासाठीच्या प्रयत्नात आफ्रिदी कोणतीही कमी करत नाही. कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्व देशभर आणि संपूर्ण जगात विनाश केले आहे. अशा कठीण स्थितीत उदात्त हावभावचे उदाहरण देत आफ्रिदीने आपल्या देशातील अल्पसंख्याकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. देशात वेगाने वाढणाऱ्या कोविड-19 साथीच्या आजाराशी लढताना त्याने हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी देशातील तळागाळातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील घटकांना मदत करण्यासाठी आफ्रिदी आणि त्याचं फाउंडेशन मैदानात सक्रिय आहे. (Coronavirus: पाकिस्तानचा संतापजनक प्रकार, लॉकडाउनच्या काळात हिंदू, ख्रिस्ती नागरिकांना राशन देणे नाकारले)

शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रसिद्ध पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने 2,000 हून अधिक कुटुंबांसाठी निधी गोळा केला आणि आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत. मंगळवारी आफ्रिदीने सोशल मीडियावर जाऊन देशातील संघर्ष करणार्‍या हिंदू आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांसाठी रेशन मोहीम राबवल्याची माहिती दिली. दिवसभरात असंख्य गरीब लोकांना मदत करणाऱ्या आफ्रिदीने मंगळवारी संघर्ष करणार्‍या अल्पसंख्यांकांसाठी विशेष देणगी मोहीम राबविली आणि हिंदू व ख्रिश्चन धर्मीयांमध्ये रेशनचे वाटप केले. आफ्रिदीच्या या कामाचे कौतुक करत माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांनी आफ्रिदीला पाठिंबा दर्शविला आणि लोकांनाही पुढाकार घेण्यास सांगितले.

आफ्रिदी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून 'डोनेट करो ना' अभियान राबवत आहे. आणि सहकारी क्रिकेटपटूंना अशा वेळी गरजूंना मदत करण्यासाठी सांगितले. पाकिस्तानात आजवर कोरोना व्हायरसची 1000 हुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.