कोरोनाचा क्रिकेटवर प्रभाव, राजीव शुक्ला यांचे IPL वर मोठे विधान-15 एप्रिलनंतर टूर्नामेंट होणे असंभव
आयपीएल माजी अध्यक्ष राजीव शुक्ला (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. आणि देशाची सद्यस्थिती पाहता टूर्नामेंटचे आयोजन करण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनीही 15 एप्रिलनंतर आयपीएल होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. शुक्ला यांनी एएनआयला सांगितले की, लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी वाढविला जाऊ शकतो असे ऐकले जात आहे आणि जर तसे झाले तर आयपीएलचे आयोजन करणे शक्य दिसत नाही. ते म्हणाले की यावेळी प्राधान्य म्हणजे या व्हायरसविरुद्ध साथीने लढा देणे आणि लोकांना वाचविणे. काय निर्णय घेते हे सर्व सरकारवर अवलंबून असेल. यंदा आयपीएल 29 मार्चपासून होणार होतं, परंतु व्हायरस आणि व्हिसा प्रतिबंधामुळे बीसीसीआयने ते 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलले. (शेन वार्न ने निवडली भारतीय खेळाडूंची IPL XI; दोन चकित करणाऱ्या खेळाडूंचा समावेश, जाणून घ्या पूर्ण लिस्ट)

राजीव यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “मला कोणतीही तयारी दिसत नाही. आमचे प्राधान्य कोरोना व्हायरसशी लढणे आणि लोकांचे जीवन वाचविणे आहे. याक्षणी सर्व काही सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. लॉकडाउन, व्हिसा बंदी आणि कोरोनाबाबत सरकार काय निर्णय घेते ते पाहूया. आम्ही सरकारच्या आदेशानुसार काम करू.’’ माजी अध्यक्ष म्हणाले, "आम्ही ऐकले आहे की लॉकडाउनची तारीख 14 एप्रिलपर्यंतनंतर वाढविली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आपण 15 एप्रिलपासून आयपीएल घेण्याचा विचार करत असाल तर ते अगदी अशक्य आहे."

शुक्रवारी पहाटेपर्यंत 16 लाखहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून 95 हजार 722 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. इटलीमध्ये जगात सर्वाधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. आजवर या देशात येथे 18 हजार 279 लोकांचा मृत्यू झाला आहे. इथे 1 लाख 43 हजार 626 पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत. दुसरीकडे, भारतात संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 6 हजार 412 आहे. यापैकी 5 हजार 218 जणांवर उपचार सुरू आहेत. 477 रुग्ण बरे झाले आहेत, तर 169 जणांचा मृत्यू झाला आहे.