
Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड (CSK vs RR Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने 16 सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेट्सने जिंकला होता. राजस्थान रॉयल्सला यावेळी पुनरागमन करायचे आहे.
हे देखील वाचा: RR vs CSK IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार दमदार स्पर्धा, सामना कुठे आणि कसा लाईव्ह पहाल?
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, आकाश माधवाल, महेश टिक्षणा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज: रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा/मुकेश कुमार, खलील अहमद.