PC-X

Chennai Super Kings Cricket Team vs Mumbai Indians Cricket Team IPL 2025 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा तिसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. गेल्या हंगामात प्लेऑफसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर दोन्ही संघ त्यांच्या मोहिमेची सुरुवात चांगल्या पद्धतीने करू इच्छितात. चेन्नई सुपर किंग्जची कमान ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे. तर पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करेल. हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी असल्याने सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करेल. दोन्ही संघ खूप बलाढ्य आहेत. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. SRH vs RR IPL 2025 Live Streaming: आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025 चा तिसरा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025 चा तिसरा सामना आज म्हणजेच 23 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी होईल.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025 चा तिसरा सामना तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकता?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025 चा तिसरा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना JioHotstar अॅपवर ऑनलाइन पाहता येईल. यासोबतच, चाहते https://marathi.latestly.com/sports/ वर सामन्याशी संबंधित लाईव्ह अपडेट्स देखील वाचू शकतात.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, रविचंद्रन अश्विन, मथिशा पाथिराणा, कमलेश नागरकोटी, नाथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी, वंश बेदी

मुंबई इंडियन्स संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रॉबिन मिंज (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, रायन रिकेल्टन, मिशेल सँटनर, जसप्रीत बुमराह, रीस टोप्ले, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कॉर्बिन बॉश, मुजीब उर रहमान, हार्दिक पंड्या, कृष्णन श्रीजित, कर्ण शर्मा, राज बावा, अर्जुन तेंडुलकर, बेवन जेकब्स, अश्विनी कुमार. सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर