Jasprit Bumrah (Photo Credit - X)

IND vs BAN 1st Test 2024: जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटी (IND vs BAN 1st Test) सामन्यात शानदार गोलंदाजी केली आहे. या सामन्यात बुमराहने 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या आहेत. 400 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो भारताचा 10वा गोलंदाज आहे. बुमराहने भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. यासोबतच त्याचाही विशेष यादीत समावेश करण्यात आला आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st Test 2024: आकाश दीपच्या घातक इनस्विंगमुळे बांगलादेशचे फलंदाज क्लीन बोल्ड, गौतम गंभीर आणि मॉर्नी मॉर्केल खूश; पाहा व्हिडिओ)

चेन्नईमध्ये बुमराहची घातक गोलंदाजी

बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात वृत्त लिहिपर्यंत 227 डावात 400 बळी घेतले होते. बुमराहची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात 19 धावांत 6 विकेट्स घेणे. चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्धही बुमराहने प्राणघातक गोलंदाजी केली आहे.

बुमराहने मोडला हरभजनचा विक्रम

बुमराहने हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. भारतासाठी सर्वात कमी डावात 400 बळी घेण्याच्या बाबतीत त्याने भज्जीला मागे सोडले आहे. बुमराहने 227 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर हरभजनने 237 डावात ही कामगिरी केली होती. या यादीत रविचंद्रन अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 216 डावात 400 बळी घेतले होते. तर कपिल देव यांनी 220 डावात 400 बळी पूर्ण केले होते.

वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या क्रमांकावर -

टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या स्थानावर आहे. या यादीत कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याने 687 विकेट घेतल्या आहेत. झहीर खान 610 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 551 विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेशविरुद्ध बुमराहचा कहर 

चेन्नई कसोटीत बांगलादेशच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी केली. वृत्त लिहिपर्यंत त्याने 8 षटकात 34 धावा देत 3 बळी घेतले आहेत. या काळात 1 मेडन ओव्हरही टाकण्यात आला. बुमराहने शादमान इस्लाम, मुशफिकुर रहीम आणि हसन महमूद यांना बाद केले.