भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) हा त्याच्या संयमी स्वभावासाठी परिचित आहे. मैदानात असू किंवा मैदानाबाहेर राहुल द्रविड नेहमीच शांत दिसला आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये राहुल द्रविड चक्क सिग्नलवर वाहनांची तोडफोड करताना दिसत आहे. याशिवाय, तो इंदरानगरचा गुंडा (Indira Nagar Ka Gunda) असल्याचे लोकांना सांगत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने हा व्हिडिओ ट्विट केला होता. तसेच राहुल भाईची ही बाजू कधीच पाहिली नव्हती, असेही विराट कोहली म्हणाला आहे.
राहुल द्रविडचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एक जाहीरात आहे. या जाहीरातीमध्ये राहुल द्रविडचे आक्रमक रुप पाहून विराट कोहलीने गंमत म्हणून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे. हे देखील वाचा- Commonwealth Games 2021: कॉमन वेल्थ गेम्स खेळण्यासाठी पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघ उतरणार मैदानात; 'हे' 6 देश ठरले पात्र
व्हिडिओ-
राहुल द्रविडने भारतीय संघाकडून 164 टेस्ट, 344 वनडे आणि 1 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. द्रविडने एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात 10 हजारांपेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आगे. द्रविडने 286 कसोटी डावांमध्ये एकूण 13 हजार 288 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये त्याने 39.16 च्या सरासरीने 10 हजार 889 धावा केल्या आहेत.