Women's National Cricket Teams (Photo Credit: ICC)

इग्लंडमध्ये (England) पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) महिला क्रिकेट संघही (Women's National Cricket Teams) दिसणार आहे. या कॉमन वेल्थ गेम्समध्ये खेळणार्‍या क्रिकेट संघांची नावे समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) आज (26 एप्रिल) या गेममध्ये स्थान मिळवण्यास यशस्वी ठरलेल्या संघाची नावे जाहीर केली आहेत. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या संघांची नावे जाहीर करणारी आयसीसी ही पहिली संस्था आहे. कॉमनवेल्थ गेम्स पुढील वर्षी 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंघम येथे पार पडणार आहे.

आयसीसी आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने आगामी कॉमन वेल्थ गेममध्ये सहभाग घेणाऱ्या महिला क्रिकेट संघाची नावे जाहीर केली आहेत. महत्वाचे म्हणजे, 22 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेट संघ यात सहभागी होणार आहेत. याआधी 1998 मध्ये पुरुष क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय स्वरूपात एक स्पर्धा झाली होती. क्वालमपूर येथे झालेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली होती. हे देखील वाचा- Pat Cummins Donations: कोरोनाविरुद्ध लढ्यात पॅट कमिन्सचे मोठे योगदान, भारताला इतक्या लाखांची केली मदत

आयसीसीचे ट्वीट-

पुढच्या वर्षी होणाऱ्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये इंग्लंड सह एकूण 6 संघ सामील होणार आहेत. टी-20 स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीजचा संघ असणार आहे. 1 एप्रिल 2021 रोजी आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी -20 रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या संघांनाच पात्रता मिळाली आहे.