BPL 2019-20: बीपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये फ़िक्सिसिंगचा संशय, 'या' वेस्ट इंडिज गोलंदाजाने टाकला चकित करणारा वाईड आणि नो-बॉल, पाहा हा Video
क्रिशमार संतोकी (Photo Credit: Twitter)

आपणाला कधीही दिसणारा सर्वात हास्यास्पद नो-बॉलमुळे मॅच फिक्सिंग (Match-Fixing) झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. बांग्लादेश प्रीमियर लीगच्या (Bangladesh Premier League) चटोग्राम चैलेंजर्स (Chattogram Challengers) और सिलहट थंडर (Sylhet Thunder) यांच्यात झालेल्या सामन्यात विचित्र क्षण पाहायला मिळाला, जेव्हा वेस्ट इंडिजचा माजी वेगवान क्रिकेटपटू क्रिशमार संतोकी (Krishmar Santokie) याने सर्वांना चकित करणारा पहिले वाईड आणि नंतर नो-बॉल टाकला. बांग्लादेश प्रीमियर लीगचा 7 वा सत्र बुधवारपासून सुरू झाला आहे. यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये रोमांच आणि उत्साह आहे पण या मोसमातील पहिला सामना वाईट कारणांमुळे चर्चेत आला आहे. 7 व्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात मॅच फिक्सिंगसारख्या मोठ्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता दिसत आहे. यामध्ये विंडीजच्या या माजी गोलंदाजाने टाकलेला वाईड आणि नो-बॉल चर्चेत आला आहे.

बांग्लादेश प्रीमियर लीगमधील पहिला सामना खेळत असलेल्या सिलहट थंडरसाठी संतोकीने आपल्या पहिल्या षटकातील पाचवा चेंडू नो-बॉल टाकला. हा नो-बॉल इतका मोठा होता की कॉमेंटेटरही आश्चर्यचकित झाले. संतोकीचा पाय क्रीजपासून खूपच दूर होता. 2010 मध्ये लॉर्ड्स कसोटीदरम्यान मोहम्मद आमिर याने टाकलेल्या नो-बॉल सारखा हा चेंडू होता. ज्याच्यानंतर आमिरवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यानो बॉलनंतर संतोकीने खूप मोठा वाईड बॉल टाकला. संतोकीच्या या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून नेटकरी त्याला स्पॉट-फिक्सिंग म्हणत आहे. यात किती सत्य आहे हे कोणालाही माहिती नाही. पाहा हा व्हिडिओ:

संतोकी, आपण हे थोडे अधिक स्पष्ट करू शकाल का?

संतोकीला हे दोन प्रसंग समजावून सांगायला लागतील.

मॅच फिक्सिंग

वेस्ट इंडीजचा संतोकी हा टी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज मानला जातो आणि सध्या तो जगभर क्रिकेट लीग खेळताना दिसत आहे. त्याने विंडीजकडून 12 टी-20 मॅचमध्ये 18 गडी बाद केले आहेत. आयपीएलमध्येमुंबई इंडियन्सकडून 2 सामन्यात 3 गडी बाद केले. संतोकी गेली 5 वर्षे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसला नाही.