मुंबई: बुधवारी श्रीलंकेने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद (Sri Lanka Beat India) केली. श्रीलंकेने एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकली. 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर श्रीलंकेच्या संघाने मायदेशात एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला आहे. श्रीलंकेच्या संघाने विजयानंतर जल्लोष साजरा केला. मात्र, त्यांच्या उत्सवाची रंगतच उधळली गेली आहे. खरेतर, श्रीलंकेचा युवा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमा (Praveen Jayawickrama) याच्यावर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे आरोप मॅच फिक्सिंगशी संबंधित आहेत.
श्रीलंकेचे गोलंदाज मॅच फिक्सिंगमध्ये अडकला
श्रीलंकेचा युवा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमा याच्याशी लंका प्रीमियर लीग 2021 दरम्यान मॅच फिक्सर्सनी संपर्क साधला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयविक्रमाने लंका प्रीमियर लीगच्या 2021 सीझन दरम्यान आंतरराष्ट्रीय सामने फिक्सिंगसाठी आणि त्याच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आयसीसीला लगेच दिली नाही. (हे देखील वाचा: Ihsanullah Janat on 5 years Banned: अफगाणिस्तानचा क्रिकेटर इहसानुल्लाह जनातवर मॅच फिक्सिंगचा आरोप, पाच वर्षांची बंदी)
Sri Lanka spinner charged with breaching the ICC Anti-Corruption Code.
Details ⬇️https://t.co/anWDBjeilQ
— ICC (@ICC) August 8, 2024
जयविक्रमावर तपासात अडथळा आणल्याचा आरोप
आयसीसीनुसार, सामना फिक्स करण्यासाठी श्रीलंकेच्या या गोलंदाजाशी दोनदा संपर्क करण्यात आला. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आणि दुसऱ्यांदा 2021 च्या लंका प्रीमियर दरम्यान त्याने लगेचच आयसीसीला माहिती दिली नाही. याशिवाय जयविक्रमावर तपासात अडथळा आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कारण त्याने काही मेसेज डिलीट केले होते.