ICC Cricket World Cup (Photo Credit - Twitter)

5 ऑक्टोबरपासून भारतात पुन्हा एकदा विश्वचषक 2023 च्या (World Cup 2023) तिकिटांची विक्री सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सामना होणार आहे त्याबाबत राज्य क्रिकेट संघटनेशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे 4 लाख तिकिटांची विक्री होणार आहे. वास्तविक, 2011 नंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. तिकिट विक्रीच्या दुसऱ्या टप्प्यात, ज्या लोकांना पहिल्या फेरीत कोणत्याही कारणामुळे तिकीट मिळू शकले नाही, त्यांनाही तिकीट खरेदी करता येणार आहे. भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्याचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे.

विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री कधी सुरू होणार?

विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची सामान्य विक्री 8 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. https://tickets.cricketworldcup.com या वेबसाइटला भेट देऊन चाहते तिकीट बुक करू शकतील.

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले?

बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "जगभरातील क्रिकेटप्रेमी आता वर्षातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची जागा बुक करू शकतात." 8 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू होईल. https://tickets.cricketworldcup.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन चाहते तिकिटे खरेदी करू शकतात. वेळ आल्यावर चाहत्यांना तिकीट विक्रीच्या पुढील टप्प्याबद्दल माहिती दिली जाईल.