बीसीसीआय (Photo Credits: IANS)

BCCI : बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरी घटनेनंतर शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI ) 28 व्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीच्या अजेंड्यावर इंडियन प्रीमियर लीग ( IPL) विजयाच्या जल्लोषासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. आज त्या बैठकीत च्रचा केली जाईल.

 

गेल्या बुधवारी ही घटना घडली, घटनेवेळी सुमारे 2.5 लाख चाहते तेथे उपस्थित होते. आवडत्या स्टार्सची झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या परिसरात गर्दी करत होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि 56 जण जखमी झाले.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "आयपीएल विजय साजरा करण्यासाठी नियम बनवण्याची गरज बैठकीत चर्चा केली जाईल." भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी मालिकेसाठी स्थळांच्या निवडीवरही या बैठकीत चर्चा केली जाईल. याशिवाय, वय पडताळणीच्या सध्याच्या प्रक्रियेचाही बैठकीत आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. वयोगटातील क्रिकेटमध्ये, विशेषतः 16 वर्षांखालील (मुले) आणि 15 वर्षांखालील (मुली) श्रेणींमध्ये, वयाची फसवणूक रोखण्यासाठी ही एक प्रणाली आहे.