बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकत्ता येथील वुडलॅन्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ANI वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या ते आउट ऑफ डेंजर आहेत. मात्र त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान बुधवारी सौरव गांगुली यांनी ईडन गार्डनला भेट दिली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी साठी त्यांनी तयारीचा आढावा घेतला होता. तसेच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या प्रेसिडंट सोबतहीचर्चा केली होती. मागील काही दिवसांपासून सौरव गांगुली यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. पश्चिम बंगाल मध्ये राज्यपालांची भेट घेतली होती. यामुळे ते भाजपात प्रवेश करत आहेत का? असा अनेकांच्या मनात प्रश होता. पण राज्यपालांनी भेटायला बोलावल्यानंतर त्यांची भेट घ्यावीच लागते असे बोलून थेट राजकारण प्रवेशाबद्दलच्या चर्चांवर बोलणं टाळलं होतं. बंगालच्या राज्यपालांनी त्यानंतर ट्वीट करत या भेटीबाबत बोलताना ईडन गार्डनला भेट द्यायला आवडेल असे म्हटलं होतं. Diego Maradona यांच्या निधनानंतर भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा, सौरव गांगुली यांनी वाहिली भावनिक श्रद्धांजली.

ANI Tweet

काही वेळापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत सौरव गांगुलीला माईल्ड कार्डिएक अरेस्टचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगत त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीत भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना देखील अचानक छातीत दुखू लागल्याने अ‍ॅडमिट करण्यात आले होते. त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.