Diego Maradona यांच्या निधनानंतर भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा, सौरव गांगुली यांनी वाहिली भावनिक श्रद्धांजली
डिएगो मॅराडोनासमवेत सौरव गांगुली (Photo Credits: @SGanguly99/Twitter)

Diego Maradona Passes Away: अर्जेंटिनाचा (Argentina) महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे वयाच्या 60 व्या वर्षी बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोनाच्या निधनाने संपूर्ण क्रीडा जगात तसेच अर्जेंटिनामध्ये शोककळा पसरली आहे. अनुभवी फुटबॉलर मॅराडोना यांच्या मेंदूत रक्ताच्या गुंडाळ्यामुळे मेंदूत शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यासाठी त्यांना ला प्लाटा क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अल्कोहोल अवलंबित्वासाठी उपचार घेण्यासाठी रिकव्हरी क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते, अशी माहिती BBCने दिली. विविध अहवालानुसार, 1986 विश्वचषक जिंकणारा मॅराडोना यांचे तिग्रे येथे घरी निधन झाले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Diego Maradona Passes Away: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर 'डिएगो मॅराडोना'चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

गांगुली यांनी ट्विट केले आणि म्हटले की, "माझा नायक नाही राहिला.. माझा Mad Genius विश्रांती घेते.. मी फुटबॉल तुमच्यासाठी पाहिला.." उल्लेखनीय म्हणजे, गांगुली कोलकातामध्ये एका चॅरिटी मॅचमध्ये दिवंगत मॅराडोनाबरोबर खेळला होता. शिवाय, मॅरेडोना यांचे चांगले मित्र आणि ब्राझिलियन फुटबॉलर Pele यांनीही आपल्या मित्राच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि म्हटले, "किती दुर्दैवी बातमी आहे. मी माझा एक चांगला मित्र गमावला आणि जगाने एक महान खेळाडू. खूप काही बोलण्यासारखं आहे पण सध्या त्याच्या परिवाराला बळ मिळो हीच माझी इच्छा आहे. एक दिवस आम्ही दोघंही वर फुटबॉल खेळू ही आशा आहे." पहा मॅराडोनाच्या निधनावर गांगुलीची प्रतिक्रिया...

पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोही मॅरेडोना यांच्या निधनामुळे भावूक झाला. मॅरेडोना यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत रोनाल्डोने म्हटले, "आज मी माझ्या एका चांगल्या मित्राला अखेरचा रामराम करतोय. ते फुटबॉलमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक होते. खऱ्या अर्थाने जादूगार…ते आपल्याला लवकर सोडून जात आहेत पण त्यांच्या मागे त्यांचा खेळ कायम लक्षात राहिल."

दुसरीकडे, त्यांचा वारसा चालवणाऱ्या लिओनेल मेस्सीने देखील शोक व्यक्त केला. पाहा काय म्हणाला मेस्सी

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

दरम्यान, मॅराडोनाने चार फिफा विश्वचषक खेळले होते. 1986 मध्ये त्यांनी अर्जेटिनाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले आणि फुटबॉल विश्वचषक जिंकला. 30 ऑक्टोबर रोजी मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला होता. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोनाला उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते. एका बॉडीगार्डमध्ये कोरोनाची लक्षणे पाहिल्यानंतर गेल्या आठवड्यात मॅरेडोना यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते.