भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला प्रतिष्ठित पॉली उमरीगर (Polly Umrigar) आणि दिलीप सरदेसाई (Dilip Sardesai) पुरस्काराने गौरविण्यात आले. 2018-19 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बुमराहला हा सन्मान देण्यात आला. बीसीसीआयच्या (BCCI) यंदाच्या पुरस्कारात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कोणताही पुरस्कारमिळालेला नाही. बुमराहने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 5 गडी बाद केले होते. पॉली उमरीगर ट्रॉफी सर्वोत्कृष्टआंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूला दिले जाते. याबरोबरच या पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या बुमराहला सन्मानपत्र, ट्रॉफी आणि 15 लाख रुपयांची बक्षीसही देण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये 2-1ने जिंकलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेतहीबुमराहची मुख्य भूमिका राहिली होती. (रोहित शर्मा,मोहम्मद शमी खेळणार न्यूझीलंड टी -२० मालिकेत; बीसीसीआयने टीम इंडिया संघाची केली घोषणा)
यासह युवा महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा (Shafali Verma) हिला महिला क्रिकेटमधील उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या वर्षी शेफालीने नऊ टी -20 सामन्यांत 222 धावा केल्या. यासह, तिला 2018-19 हंगामात जुनिअर घरगुती क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी जगमोहन डालमिया (Jaganmohan Dalmia) पुरस्कारही देण्यात आला. शेफालीने 46 सामन्यांच्या देशांतर्गत सामन्यांमध्ये सात शतकं आणि पाच अर्धशतकांसह वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 1923 धावा केल्या आहे. महिला क्रिकेटर पूनम यादव (Poonam Yadav) हिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू - महिलाचा सन्मान देण्यात आला. भारताचा माजी कर्णधार ख्रिस श्रीकांत आणि अंजुम चोप्रा यांना कर्नल सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित कारणात आले. अंजुम एक उत्तम फलंदाज होती. 100 वनडे सामने खेळणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. आपल्या 17 वर्षांच्या कारकीर्दीत अंजुमने 4 विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. खाली पाहा बीसीसीआय पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी:
पुरुष वर्ग
कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार: कृष्णामचारी श्रीकांत
बीसीसीआय विशेष पुरस्कार: दिलीप दोशी
पोली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर: जसप्रीत बुमराह
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय डेब्यू: मयंक अग्रवाल
दिलीप सरदेसाई पुरस्कार (कसोटीत सर्वाधिक धावा): चेतेश्वर पुजारा
दिलीप सरदेसाई पुरस्कार (कसोटीतील सर्वाधिक विकेट्स): जसप्रीत बुमराह
महिला वर्ग
लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: अंजुम चोप्रा
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: पूनम यादव
सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर (जुनिअर घरगुती): शेफाली वर्मा
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय डेब्यू: शेफाली वर्मा
सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर (ज्येष्ठ घरगुती): दिप्ती शर्मा
सर्वोत्कृष्ट फलंदाज: स्मृती मंधाना (वनडेमध्ये सर्वाधिक धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: झुलन गोस्वामी (वनडेमधील सर्वाधिक विकेट)
इतर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अंपायर (घरगुती): वीरेंद्र शर्मा
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी: विदर्भ क्रिकेट असोसिएशन
रणजी करंडकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू: शिवम दुबे (मुंबई)
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू: नितीश राणा (दिल्ली)
माधवराव सिंधिया पुरस्कार: (रणजीतील सर्वाधिक धावा): मिलिंद कुमार
माधवराव सिंधिया पुरस्कार: (रणजीतील सर्वोच्च विकेट): आशुतोष अमन
एम.ए. चिदंबरम ट्रॉफी: (अंडर -23 मधील सर्वाधिक धावा-सीके नायडू ट्रॉफी) मनन हिंगराज
एमए चिदंबरम ट्रॉफी: (अंडर-23 मध्ये सर्वाधिक विकेट-सीके नायडू ट्रॉफी) सिडक सिंह
एम.ए. चिदंबरम ट्रॉफी: (19 वर्षांखालील सर्वाधिक धावा-कूच विहार करंडक) वत्सल गवत
एम.ए. चिदंबरम ट्रॉफी: (19 वर्षांखालील सर्वाधिक विकेट- कूच विहार ट्रॉफी) अपूर्व आनंद