Big Bash League 2020-21: अरेरे! एकच चेंडूवर नाट्यमय पद्धतीने दोनदा रनआऊट झाला फलंदाज, पहा हा मजेदार व्हिडिओ
जेक वेदरल्ड रनआऊट (Photo Credit: Twitter/BBL)

ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (Big Bash League) दरम्यान अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सचा (Adelaide Strikers) फलंदाज जेक वेदरल्ड (ake Weatherald) एकाच चेंडूवर एकदा नव्हे तर दोनदा धावबाद झाला. सिडनी थंडरविरुद्ध (Sydney Thunders) झालेल्या सामन्याच्या 10व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली. वेदरल्ड नॉन-स्ट्रायकरला उभा असून फलंदाजीला फिल सॉल्ट (PhilL Salt) होता. क्रिस ग्रीनच्या चेंडूवर सॉल्टने सरळ शॉट खेळला आणि तो गोलंदाजाच्या हाताला लागून नॉन-स्ट्रायकरच्या दिशेच्या स्टम्पला लागला. वेदरल्डची बॅट हवेत होती जेव्हा चेंडू स्टम्पला लागला आणि  गोलंदाजाने अपील केली. अंपायरने निर्णय थर्ड अंपायरवर सोपवला ज्यांनी वेदरल्ड धावबाद असल्याचा निर्णय दिला. पण हे नाटकीय रनआऊट इथेच संपले नाही. सॉल्टने तोवर धाव घेण्यासाठी क्रीज सोडली होती आणि जवळपास दुसऱ्या दिशेला पोहचला होता. मात्र, वेदरल्डचे लक्ष नसल्यामुळे तो धाव घेण्यासाठी उशिरा पळाला. इतक्यात सॅम बिलिंगने (Sam Billing) चेंडू उचलला आणि विकेटकीपरच्या दिशेने थ्रो करत वेदरल्डला दुसऱ्यांदा धावबाद केले. (BBL 2020-21: आंद्रे फ्लेचरचा डबल धमाका! हवेत उडी मारून पकडले दोन अफलातून कॅच, व्हिडिओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल Watch Video)

"आता काय झाले?! जेक वेदरल्ड एकच चेंडूवर दोन्ही टोकावर बाद झाला," असे कॅप्शन देत बिग बॅश लीगने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या नाट्यमय रनआऊटचा व्हिडिओ शेअर केला. वेदरल्ड 31 धावा करून माघारी परतला. वेदरल्डच्या या रनआऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तथापि, एका चेंडूवर फलंदाजाला दोनदा धावबाद करता येत नाही. म्हणून, वेदरल्डला नॉन-स्ट्रायकरच्या दिशेला धावबाद मानले गेले. निराश होऊन वेदरल्डड मगरी परतला. वेदरल्डची मैदानावर अशी वाईट परिस्थिती होती की एका वेळी दोन्ही फलंदाज एकाच टोकाला उभे होते ज्यानंतर वेदरल्डने विकेटकीपरच्या दिशेने धाव घेतली आणि धावबाद झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by KFC Big Bash League (@bbl)

अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सने पहिले फलंदाजी केली आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 गडी विकेट गमावून 159 धावांपर्यंत मजल मारली. अ‍ॅडलेडचा कोणताही फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही. हा सामना जिंकण्यासाठी आणि  बीबीएल 2020-21 च्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी सिडनी थंडरला 160 धावांची गरज होती, मात्र संघ 153 धावाच करू शकला आणि पराभव पत्करावा लागला. दरम्यान, सध्या पर्थ स्कॉर्चर्स यंदा बीबीएलमध्ये 13 सामन्यांत 32 गुणांसह पॉईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी आहेत. पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे.