
190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. जॉन्सन चार्ल्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या, तर कर्णधार निकोलस पूरनने 10 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. संघाची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली आणि केवळ रोमॅरियो शेफर्डने 27 चेंडूत 33 धावा केल्या. बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 109 धावांत गारद झाला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रिशाद हुसेनने 4 षटकात केवळ 21 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्यासोबत मेहदी हसनने 3 षटकांत 13 धावा देत 2 बळी घेतले. तस्किन अहमदनेही 3.4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले.